विशेष प्रतिनिधी
पुणे : NEET Paper Leak Case नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआय पथकाने शुक्रवारी पुण्यातील शुक्रवार पेठेतील रहिवासी, एनटीएची फिजिक्सची पेपरसेटर मनीषा हवालदारला अटक केली. नीट प्रकरणात महाराष्ट्रातील ही सातवी अटक आहे. दरम्यान, लातूरमध्ये सीबीआयने शुक्रवारी एका बीएएमएस डॉक्टर व बालरोग तज्ज्ञाची कसून चौकशी केली. या बालरोगतज्ज्ञाच्या मुलाने पेपर संपताच नोट्स विकल्याचे सांगितल्यामुळे पथक रद्दीवाल्याच्या दुकानातही पोहोचले होते. दरम्यान, परभणी, हिंगोली येथेही शुक्रवारी सीबीआयच्या पथकाने छापे टाकले.NEET Paper Leak Case
दोन दिवस सीबीआयच्या ताब्यात राहून सीबीआयचे साक्षीदार झालेले लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे घरी परतले. त्या दरम्यान, लातुरात ठाण मांडून बसलेले सीबीआयचे पथक ॲक्टिव्ह मोडवर आले. ४ अधिकाऱ्यांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास जुना औसा रोडवरील डॉ. मनोज देशमुख यांची त्यांच्या घरात चौकशी केली. त्यांच्या मुलाने दिलेल्या नीटविषयी प्रश्न विचारले. त्यांच्या मुलाने सोडवलेली नीटची प्रश्नपत्रिका ताब्यात घेतली. त्यानंतर दयानंद कॉलेज रोडवरील बालरोगतज्ज्ञ डॉ. विनोद स्वामींचीही चौकशी केली. त्यांचा मुलगाही परीक्षार्थी होता.NEET Paper Leak Case
मनीषा हवालदार-मनीषा मांढरे कनेक्शन
सेठ हिरालाल सराफ प्रशालेत कार्यरत पेपरसेटर मनीषा संजय हवालदार नीट यूजी २०२६ च्या प्रक्रियेत होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) तिची भौतिकशास्र तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली होती. मनीषा हवालदारला भौतिकशास्त्राची प्रश्नपत्रिका माहिती असल्याने तिने काही प्रश्न एनटीएची जीवशास्त्रतज्ज्ञ मनीषा मांढरेला एप्रिल महिन्यात दिले. हे प्रश्न आणि नीट प्रश्नपत्रिकेत आलेले प्रश्न यांची पडताळणी केली असता काही प्रश्न तंतोतंत जुळले. त्यामुळे मनीषा हवालदारला सीबीआयने शुक्रवारी अटक केली.
नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआय पथकाने शुक्रवारी पुण्यातील शुक्रवार पेठेतील रहिवासी, एनटीएची फिजिक्सची पेपरसेटर मनीषा हवालदारला अटक केली. नीट प्रकरणात महाराष्ट्रातील ही सातवी अटक आहे. दरम्यान, लातूरमध्ये सीबीआयने शुक्रवारी एका बीएएमएस डॉक्टर व बालरोग तज्ज्ञाची कसून चौकशी केली. या बालरोगतज्ज्ञाच्या मुलाने पेपर संपताच नोट्स विकल्याचे सांगितल्यामुळे पथक रद्दीवाल्याच्या दुकानातही पोहोचले होते. दरम्यान, परभणी, हिंगोली येथेही शुक्रवारी सीबीआयच्या पथकाने छापे टाकले.
दोन दिवस सीबीआयच्या ताब्यात राहून सीबीआयचे साक्षीदार झालेले लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे घरी परतले. त्या दरम्यान, लातुरात ठाण मांडून बसलेले सीबीआयचे पथक ॲक्टिव्ह मोडवर आले. ४ अधिकाऱ्यांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास जुना औसा रोडवरील डॉ. मनोज देशमुख यांची त्यांच्या घरात चौकशी केली. त्यांच्या मुलाने दिलेल्या नीटविषयी प्रश्न विचारले. त्यांच्या मुलाने सोडवलेली नीटची प्रश्नपत्रिका ताब्यात घेतली. त्यानंतर दयानंद कॉलेज रोडवरील बालरोगतज्ज्ञ डॉ. विनोद स्वामींचीही चौकशी केली. त्यांचा मुलगाही परीक्षार्थी होता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App