महाराष्ट्राच्या पोलीस दलाची गुणवत्ता जागतिक पातळीवर नेण्याचा फडणवीस सरकारचा संकल्प; राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

The Fadnavis government

विशेष प्रतिनिधी

मुंबई : ३६ वी ‘महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६’ चा उद्घाटन सोहळा आज मुंबईतील कालिना येथील सशस्त्र पोलीस मुख्यालयात संपन्न झाला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस दलाचे मनोधैर्य वाढण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधून या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.

राज्यातील पोलीस दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांना जागतिक पातळीवर नेण्याचा संकल्प याप्रसंगी व्यक्त केला. मजबूत कायदा-सुव्यवस्था हीच राज्याच्या सर्वांगीण विकासाची गुरुकिल्ली असल्याचे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

सरकार हे केवळ आदेश देणारे नसून पाठीशी उभे राहणारे आहे. पोलिसांसाठी दर्जेदार घरे, सुसज्ज पोलीस स्टेशन, आधुनिक शस्त्रे, वाहने आणि सायबर सुरक्षेसाठी अत्याधुनिक साधने उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.



 महाराष्ट्र पोलीस खिलाडी नंबर वन

आपण पोलिसांना नेहमी खाकी वर्दीत पाहतो, मात्र आज ते क्रीडावेशात मैदानात उतरलेले पाहणे अभिमानास्पद आहे. या क्रीडा स्पर्धा म्हणजे महाराष्ट्राचे ‘महा ऑलिम्पिक’ असून, महाराष्ट्र पोलीसच खरे ‘खिलाडी नंबर वन’ असल्याचे जगाला दाखवण्याची ही मोठी संधी आहे. हे खेळाचे मैदान आहे, त्यामुळे इथे पंच आहेत, पण पंचनामा नाही. त्यामुळे इथे नोंद होईल ती फक्त विक्रमांची, असेही याप्रसंगी शिंदेंनी नमूद केले. त्यामुळे अशा क्रीडा स्पर्धा या पोलिसांचा मानसिक तणाव कमी करून, पोलीस दलात मैत्रीभाव वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात, असेही‌ एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

याप्रसंगी मंत्री मंगलप्रभात लोढा, गृहराज्यमंत्री योगेश कदम, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

The Fadnavis government’s resolve to elevate the quality of the Maharashtra Police Force to a global level.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात