Manohar Bhonsle : बाळू मामाचा अवतार सांगणारा मनोहर भोसले पुन्हा गजाआड; कुर्डुवाडी पोलिसांकडून भोंदूगिरीप्रकरणी बेड्या

Manohar Bhonsle

विशेष प्रतिनिधी

सोलापूर : Manohar Bhonsle  स्वतःला बाळू मामाचा अवतार सांगणाऱ्या मनोहर मामा भोसलेला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा बेड्या ठोकल्या आहेत. भोंदूगिरी आणि आर्थिक फसवणुकीच्या ताज्या प्रकरणात कुर्डुवाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मनोहर भोसलेवर याआधीच करमाळा आणि सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात महिलांवर अत्याचार केल्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. याशिवाय बारामती आणि दौंड पोलीस ठाण्यांमध्येही त्याच्यावर आर्थिक फसवणूक आणि भोंदूगिरीचे गुन्हे नोंदवण्यात आले असून, आजच्या कारवाईमुळे त्याच्यावरील गुन्ह्यांची मालिका अधिक गडद झाली आहे.Manohar Bhonsle

मनोहर भोसलेवर केवळ अत्याचाराचेच नाही, तर भक्तांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन त्यांना लुबाडल्याचेही गंभीर आरोप आहेत. कॅन्सरसारखे दुर्धर आजार मंत्रतंत्राने बरे करण्याचे खोटे आश्वासन देऊन त्याने अनेक भाविकांची मोठी आर्थिक फसवणूक केली आहे. यापूर्वी अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक झाली असताना बार्शी सत्र न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. सध्या तो जामिनावर बाहेर असतानाच, फसवणूक आणि भोंदूगिरीच्या नवीन तक्रारीमुळे पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेतल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.Manohar Bhonsle



व्यवसाय उद्योगात भरभराट आणण्याचे आमिष दाखवून पूजाअर्चा करण्यासाठी मनोहर मामा भोसले याने एका भक्ताकडे 2 लाख रुपयांची मागणी केली होती. यापैकी 50 हजार रुपये दिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे भक्ताच्या लक्षात आले, ज्यावरून कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात मनोहर भोसले आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध आर्थिक फसवणूक तसेच जादूटोणा व अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणात पोलिस निरीक्षक अतुल मोहिते यांच्या पथकाने मनोहर मामा भोसलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, ‘भविष्य’ सुधारण्याचे दावे करणाऱ्या या भोंदू महाराजाचे स्वतःचेच भविष्य आता अंधकारमय होताना दिसत आहे.

मनोहर मामा भोसलेचे राजकीय नेत्यांसोबत फोटो

मनोहर मामा भोसलेचे शरद पवार, सुप्रिया सुळे, नितीन गडकरी, राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार सुनील शेळके यांसारख्या दिग्गज राजकीय नेत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नाशिक आणि संगमनेरमधील घटनांनंतर आता सोलापूर जिल्ह्यातही भोंदूगिरीचे हे गंभीर प्रकरण समोर आल्याने जनतेमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. बड्या नेत्यांसोबतच्या या फोटोंमुळे चर्चेत आलेल्या मनोहर भोसलेला आता आर्थिक फसवणूक आणि जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्या भोंदूगिरीच्या जाळ्याचा अधिक तपास सुरू आहे.

Self-Styled Godman Manohar Bhonsle Arrested Again in Solapur for Fraud

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात