वेद म्हणजे विज्ञानाधिष्ठित जीवनमार्ग; नागपूरात निरंजनभाई ठाकर वेद पाठशाळेचे उद्घाटन

विशेष प्रतिनिधी

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या हस्ते आज नागपूर येथे स्व. निरंजनभाई ठाकर यांच्या स्मारकाचे अनावरण आणि निरंजनभाई जयदेवशंकर ठाकर वेद पाठशाळेचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपले वेद हे जगातील सर्वांत प्राचीन ग्रंथ आहेत. वैज्ञानिक संशोधनांमधून वेदांचे अस्तित्व 12,000 वर्षांहून अधिक प्राचीन असल्याचे निदर्शनास येते. जगातील सर्वांत जुनी संस्कृती, भाषा आणि ज्ञान हे भारतात वेदांच्या रूपाने नांदते. वेद विहित मार्गाच्या आचरणाने आपले आधुनिक जीवनही उजळून निघते.

मनुष्याला संपूर्ण आयुष्याचे ज्ञान वेदांच्या माध्यमातून प्राप्त होते आणि हे सर्व ज्ञान वैज्ञानिक आहे. अथर्ववेदात वैज्ञानिक पद्धतीने जीवनपद्धतीचा निर्वाह कसा करावा, याचे ज्ञान आम्हाला मिळते. समृद्ध जीवनपद्धतीचे सविस्तर मार्गदर्शन करणारे असे दिव्य ज्ञान आपल्याला वेदांच्या माध्यमातून प्राप्त होते, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी वेद पाठशाळेच्या संचालकांना, आचार्यांना आणि विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिला. नितीन गडकरी यांनी वेद पाठशाळेच्या सर्व उपक्रमांना शुभेच्छा दिल्या. यावेळी इतर मान्यवर उपस्थित होते.

The Vedas represent a science-based way of life; Inauguration of the Niranjanbhai Thakar Veda Pathshala in Nagpur.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात