वृत्तसंस्था
मुंबई : JeM Terrorists देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा दहशतीने हादरवण्याचा ‘जैश-ए-मोहम्मद’ (JeM) या दहशतवादी संघटनेचा मोठा कट सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावला आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मुंबईतील कुर्ला आणि ठाणे जिल्ह्यातील खडवली परिसरात संयुक्त मोहीम राबवून दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे दहशतवादी ‘टॉय कार’चा (खेळण्यातील कार) वापर करून भीषण स्फोट घडवून आणण्याच्या तयारीत होते.JeM Terrorists
गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे, महाराष्ट्र एटीएस आणि दिल्ली स्पेशल सेलने रविवारी मध्यरात्री मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात छापेमारी केली. मुंबईतील गजबजलेल्या कुर्ला परिसरातून एकाला, तर ठाणे जिल्ह्यातील खडवली येथून दुसऱ्या संशयिताला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी या भागातील सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे.JeM Terrorists
अटक करण्यात आलेले संशयित आणि ‘जैश’ कनेक्शन
या कारवाईत पोलिसांनी दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. कामरान उर्फ सोनू उर्फ मोझे (मूळ नाव: मोसाब अहमद उर्फ कलाम) आणि बडा इमरान (मूळ नाव: मोहम्मद हमद कालरा) अशी दोघांची नावे आहेत. प्राथमिक चौकशीत हे दोन्ही आरोपी पाकिस्तानस्थित ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या थेट संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या ताब्यातून अनेक संवेदनशील कागदपत्रे, डिजिटल उपकरणे आणि आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे.
घातपाताची ‘टॉय कार’ बॉम्ब पद्धत
तपासादरम्यान समोर आलेली सर्वात धक्कादायक माहिती म्हणजे स्फोट घडवण्यासाठी वापरण्यात येणारी युक्ती. हे आरोपी खेळण्यातील कारमध्ये (Toy Car) स्फोटके पेरून दिल्लीतील गर्दीच्या ठिकाणी रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने स्फोट घडवण्याच्या तयारीत होते. सुरक्षा यंत्रणांची नजर चुकवण्यासाठी त्यांनी या अनोख्या मार्गाचा अवलंब करण्याचा कट रचला होता. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.
ऑनलाइन माध्यमातून माथी भडकवली
पोलिसांच्या माहितीनुसार, हे दोन्ही आरोपी ‘ऑनलाइन रॅडिकलायझेशन’चे शिकार झाले होते. सोशल मीडिया आणि एनक्रिप्टेड मेसेजिंग ॲप्सच्या माध्यमातून त्यांचे ब्रेनवॉशिंग करून त्यांना कट्टरपंथी बनवण्यात आले होते. सीमापार बसलेल्या त्यांच्या हँडलर्सनी त्यांना दिल्लीत घातपात घडवण्याचे आदेश दिले होते.
दिल्लीतील संभाव्य मोठा अनर्थ टळला
अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीला नेण्यात येत आहे. तिथे त्यांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळवली जाईल. या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि त्यांना स्थानिक पातळीवर कोणी मदत केली का, याचा सखोल तपास दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल करणार आहे. वेळेत झालेली ही अटक आणि उधळलेला कट यामुळे दिल्लीतील संभाव्य मोठा अनर्थ टळला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App