Aditi Tatkare : बॅनरवरून आमची निष्ठा ठरू नये; अजितदादा आणि सुनेत्रा काकींचे स्थान अढळ, दिलगिरी व्यक्त करत अदिती तटकरेंचा विरोधकांना टोला

Aditi Tatkare

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Aditi Tatkare राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुनील तटकरे यांच्या मतदारसंघात पार पडलेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमाने सध्या राजकीय वर्तुळात नवा वाद ओढवून घेतला आहे. या कार्यक्रमाच्या बॅनरवर तटकरे कुटुंबातील सदस्यांचे फोटो झळकले, मात्र राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो नसल्याने टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर, अदिती तटकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत या प्रकरणावर दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच विरोधकांना टोला देखील लगावला आहेAditi Tatkare

रायगड जिल्ह्यातील इंदापूर येथे नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांचा भव्य सत्कार सोहळा 27 मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याच्या बॅनरवर सर्वात मोठा फोटो सुनील तटकरे यांचा लावण्यात आला आहे, त्यानंतर अदिती तटकरे व अनिकेत तटकरे यांचा फोटो लावण्यात आला. त्यानंतर नवनिर्वाचित सदस्यांचा फोटो लावण्यात आला. मात्र, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार तसेच अजित पवार यांचा फोटो वगळण्यात आला असल्याचे पाहायला मिळाले. यावरून सुनील तटकरे यांच्यावर टीका करण्यात आली होती. यावर आता आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया पोस्ट करत दिलगिरी व्यक्त केली.Aditi Tatkare



 

नेमके काय म्हणाल्या अदिती तटकरे?

या वादावर पडदा टाकताना अदिती तटकरे म्हणाल्या, स्थानिक पातळीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून कार्यक्रम घेतले जातात, असे अनेक कार्यक्रम दिवसभरात होत असतात. अशाच एका ग्रामपंचायत पातळीवरील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले दिवंगत नेते अजितदादा पवार आणि राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राकाकी यांचा फोटो नव्हता, याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते.

अजितदादा असतील, सुनेत्राकाकी असतील यांचे आमच्या मनातील स्थान अढळ आहे. बॅनरवरील फोटोतून आम्हा सगळ्याच कार्यकर्त्यांची निष्ठा ठरवू नये, असे अदिती तटकरे म्हणाल्या.

तरी, यानिमित्ताने एक बरे झाले- स्थानिक कार्यक्रमातील स्थानिक पातळीवर घडलेल्या एका चुकीचा मुद्दा बनवणारी यंत्रणा कशी काम करते हे आमच्या लक्षात आले. हा मुद्दा चवीने चघळणाऱ्यांना दादा हयात असताना त्यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल मनातून किती पश्चाताप व्यक्त करावा लागत असेल देव जाणे..! बाकी काकींना पक्षाच्या कुटुंबप्रमुख म्हणून आमच्या चुकीबद्दल आमचे कान पकडण्याचा अधिकार आहेच, असेही अदिती तटकरे यांनी म्हटले.

महाराष्ट्र हे सहन करणार नाही- अमोल मिटकरी

अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील या प्रकराबाबत नाव न घेता सुनील तटकरेंवर निशाणा साधला होता. त्यांनी ट्विट करत म्हटले की, ज्यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे, त्यांचाच फोटो हटवला जातोय, हे राष्ट्रवादीचा सर्वसामान्य कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही. राष्ट्रवादीच्या दैवताना डावलून स्वत: देव बनण्याचा कुणी प्रयत्न करू नये. महाराष्ट्र हे सहन करणार नाही.

या प्रकरणावरून आमदार रोहित पवार यांनी सुनील तटकरे यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली. रोहित पवार म्हणाले, “मालकाला अलगद बाजूला सारून जेव्हा बटाईदारच जमिनीचा सातबारा स्वतःच्या नावावर करतो, याचे हे जिवंत उदाहरण आहे. जे आम्ही वारंवार बोलतोय…” यावरून सुनील तटकरे हे पक्ष ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा पुनरूच्चार रोहित पवारांनी पुन्हा एकदा केला.

Aditi Tatkare Issues Apology Over Missing Ajit Pawar Photo; Slams Opposition

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात