देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा

Modi government

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशभरातल्या शहरांमध्ये पेट्रोल, डिझेल आणि LPG इंधनासाठी मोठ्या रांगा, पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा असल्याचा खुलासा मोदी सरकारने केला.Queues for fuel in many cities in the country; But in reality, there is sufficient fuel stock in the country; Modi government’s clarification

इंधन टंचाईबाबत केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले. पेट्रोलियम मंत्रायलाने स्पष्टपणे सांगितले, की देशातील इंधन पुरवठा पूर्णपणे सुरक्षित असून परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. देशातील सर्व पेट्रोल पंप आणि LPG वितरण केंद्रांवर पुरेसा साठा उपलब्ध आहे.



 

– इंधन साठा सुरक्षित 

पेट्रोलियम मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात कुठेही पेट्रोल, डिझेल किंवा LPG ची कमतरता नाही. सर्व रिटेल फ्युएल आउटलेट्सकडे पुरेसा साठा उपलब्ध असून वितरण सुरळीत सुरू आहे. पुरवठा साखळी मजबूत असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता सध्या नाही.

सरकारने नागरिकांना इशारा दिला आहे की, काही ठिकाणी जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा अफवांपासून दूर राहावे आणि केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा, असे मंत्रालयाने नमूद केले.

– नागरिकांना सरकारचे आवाहन 

मंत्रालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले, की नागरिकांनी अनावश्यक साठेबाजी करू नये. पेट्रोल, डिझेल आणि LPG चा पुरवठा सुरळीत सुरू असल्यामुळे कोणत्याही प्रकारची घाई किंवा घबराट करण्याचे कारण नाही. जागतिक पातळीवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त होत असली, तरी भारताने परिस्थितीवर नियंत्रण ठेवले आहे.

– केंद्राकडून राज्यांना केरोसिन वाटप

आखाती देशातील युद्धाचा फटका देशातील सर्वसामान्य नागरिकांनाही बसत असताना एकीकडे गॅस एजन्सीमध्ये गॅस पुरवठ्याबाबत काही नियमावली तयार करण्यात आली आली आहे. त्यातच,आता युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राज्यांसाठी 37 लाख 44 हजार लिटर रॉकेलच्या वाटपाला मंजुरी देण्यात आली आहे. त्या माध्यमातून राज्यातील शिधापत्रिका धारकांना 3 लिटर रॉकेल मिळणार आहे.

Queues for fuel in many cities in the country; But in reality, there is sufficient fuel stock in the country; Modi government’s clarification

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात