नाशिक : शरद पवारांच्या गटातल्या नेत्यांच्या मनानुसार आता दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार नाही, असे लक्षात येताच रोहित पवारांनी आपले सगळे लक्ष अजित पवारांच्या विमान अपघाताच्या मुद्द्यावर केंद्रित केले. त्याच मुद्द्यावर यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये तिसरी पत्रकार परिषद घेतली. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत तेलगू देशम पार्टी आणि तिच्या नेत्यांना संशयाच्या घेऱ्यात आणले, पण त्याचवेळी आपण विलीनीकरणावर बोलणार नाही कारण विलीनीकरणाचा विषय काढला, की विषय भरकटत जातो, असा दावा करून रोहित पवार विलीनीकरणाच्या विषयावर बोलले. त्यांनी विलीनीकरणाचा मुद्दा काढून डॉ. अमोल कोल्हे यांचे नाव पुढे केले. Rohit Pawar
अजित पवारांच्या इच्छेनुसार विलीनीकरण होणारच होते. विलीनीकरण झाले असते, तर संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद अमोल कोल्हे यांना दिले गेले असते. कारण अजित पवारांची तशी इच्छा होती, असा दावा रोहित पवारांनी केला.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या संदर्भात तिकडचे नेते जास्त बोलतात, पण आमच्याकडे सुद्धा भरपूर माहिती आहे. पण सध्या मी तो विषय बोलणार नाही. कारण मला विषय भरकटवायचा नाही. पण विलीनीकरणासंदर्भात जयंत पाटलांच्या मुंबईतल्या घरी अनेक बैठका झाल्या. त्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तर लक्षात येईल. मंगल प्रभात लोढा यांच्यात बंगल्यासमोर जयंत पाटलांचा बंगला आहे. तिथले सीसीटीव्ही फुटेज तपासले, तरी अजित पवार अनेकदा जयंत पाटलांच्या घरी गेले हे दिसून येईल, असा दावा सुद्धा रोहित पवार यांनी केला.
200 ताकद लावली असती
महापालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका लक्षात घेतल्या तर अजित पवारच त्याचे सगळे नियोजन करत होते कारण दोन्ही राष्ट्रवादींचे मनोमिलन झाले होते. दोन्ही राष्ट्रवादींचे कार्यकर्ते एकत्रितच निवडणूक लढवत होते. त्यामुळे मोठी ताकद त्या निवडणुकीमध्ये उभी राहिली होती. अजित पवार असते तर जिल्हा परिषद निवडणुकीत सुद्धा 200 पट ताकद लावली असती. कारण अजित पवार त्या सगळ्या महत्त्वाच्या कागदपत्रांचे नियोजन करत होते. जितकी निवडणूक मोठी तितकी कागदपत्रे मोठी लागतात. हे सगळे नियोजन अजित पवार स्वतः करत होते. पण ते गेल्यामुळे 200 पट ताकद लागलीच नाही. फक्त 50 पट ताकद लावता आली, असा दावा सुद्धा रोहित पवार यांनी केला.
– अमोल कोल्हेंचे प्यादे पुढे सरकवले
पण विलीनीकरणावर बोलणार नाही. कारण विषय भरकटत जातो, असा दावा करून सुद्धा रोहित पवार त्या विषयावर बोलायचे राहिले नाहीत. त्यांनी विलीनीकरणाचा विषय बोलून वरती अमोल कोल्हे यांच्या नावाचे प्यादे पुढे सरकवून ठेवले. पण त्यामुळेच विद्यमान राजकीय वास्तव परिस्थितीत दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण पुढे ढकलायचे ते ढकलले गेलेच. कारण आता सगळी राजकीय सूत्रे सुनेत्रा पवारांच्या हातात गेलीत. सुनेत्रा पवारांची राजकीय सूत्रे भाजपच्या हातात आहेत. सुनेत्रा पवार एकट्या निर्णय घेऊ शकणार नाहीत. त्यांनी एकट्याने निर्णय घेतला तरी तो शरद पवारांना आणि त्यांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांना अनुकूल ठरेलच, अशी कुठलीही शक्यता नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App