Mumbai Metro : मुंबईत मेट्रोचा स्लॅब रोडवर कोसळला; ऑटो, कारचा चेंदामेंदा; 1 जण ठार, 3 जण जखमी, मुलुंडच्या एलबीएस रोडवर घडली दुर्घटना

Mumbai Metro

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Mumbai Metro  मेट्रो पुलाचा स्लॅब कोसळून 1 जण ठार व 3 जण जखमी झाल्याची घटना मुंबईच्या मुलुंड पश्चिम परिसरातील एलबीएस रोडवर घडली आहे. ऐन वर्दळीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. काँग्रेस व ठाकरे गटाने या प्रकरणी सरकारवर सडकून टीका करत सरकार व एमएमआरडीए प्रशासनाला मुंबईकरांच्या जीवाचे काहीही देणेघेणे नसल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे.Mumbai Metro

यासंबंधीच्या माहितीनुसार, मुलुंड पश्चिम परिसरातील एलबीएस रोडवर मेट्रो पुलाचे काम सुरू आहे. या पुलाच्या स्लॅबचा एक तुकडा शनिवारी दुपाीर 12.20 च्या सुमारास अचानक रस्त्याने जाणाऱ्या ऑटो व एका कारवर पडला. त्यात ऑटो व कारमधून प्रवास करणारे 3-4 जण जखमी झाले. या जखमींना तत्काळ लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान एका जखमीचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटली नाही. गंभीर गोष्ट म्हणजे या ठिकाणी पुलाचे काम सुरू असतानाही बॅरिकेट्स लावण्यात आले नव्हते किंवा इतर योग्य ती उपाययोजनाही करण्यात आली नव्हती. त्यामुळे या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.Mumbai Metro



घटनास्थळी सुरक्षा नियमांची अवहेलना

स्लॅब कोसळल्याच्या घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलिस, मेट्रो प्राधिकरणाचे कर्मचारी व संबंधित विभागाचे कर्माचारी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संपूर्ण परिसर ताब्यात घेऊन वाहतूक वळवली. रस्त्यावर पडलेला ढिगारा हटवला. सध्या हा अपघात नेमका कशामु्ळे झाला? याचा तपास सुरू आहे. तसेच या प्रकरणी बांधकामाविषयी सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यात आले होते का? याचीही चौकशी केली जात आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे मुलुंड येथील लाल बहादूर शास्त्री (एलबीएस रोड) रोडवर गत अनेक महिन्यांपासून मेट्रोच्या मार्गिकेचे काम सुरू आहे. या प्रकरणी दररोज भलेमोठे गर्डर व स्लॅब वर-खाली चढवण्याचे काम सुरू असते. त्यातच आज ही दुर्घटना घडल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

मुंबई महापालिकेने काय म्हटले?

मुंबई महापालिकेने या दुर्घटनेची माहिती देताना म्हटले आहे की, आज दुपारी 12.20 वा. मुलुंड (पश्चिम) येथील एलबीएस रोडवरील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ मेट्रोच्या खांबाचा काही भोग कोसळला. बांधकाम सुरू असताना सिमेंट मेट्रोच्या खांबाचा काही भाग कोसळून रिक्षावर पडला. मुंबई अग्निशमन दल, पोलिस, मेट्रो कर्मचारी, वॉर्ड कर्मचारी आणि 108 रुग्णवाहिका सेवा घटनास्थळी उपस्थित आहेत. ऑटोरिक्षातील 3-4 जण जखमी झाल्याची शक्यता आहे. तपशीलांची प्रतीक्षा आहे.

दुर्घटनेवर काँग्रेसची टीका

काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी या दुर्घटनेवरून सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्या म्हणाल्या, मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? आज दुपारी मुलुंड पश्चिम, एलबीएस रोडवर जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ मेट्रोच्या निर्माणाधीन पिलरचा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात एक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत. सरकार आणि एमएमआरडीए प्रशासनाला काही देणंघेणं आहे की नाही? फक्त इन्फ्रा मॅन म्हणून PR करायचे, मार्केटिंग करायचं पण मुंबईकरांचा जीव टांगणीला लागला आहे, त्याच काय?

मेट्रोचे काम सुरू असताना सुरक्षेचे नियम फक्त कागदावरच का? वर्दळीच्या रस्त्यावर काम सुरू असताना खालून जाणाऱ्या वाहतुकीसाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था का नव्हती? मेट्रोची कामं वेगाने होत आहेत, हे दाखवण्याच्या नादात त्याचा दर्जा आणि तांत्रिक सुरक्षेकडे दुर्लक्ष होतंय का? जबाबदारी कोणाची? दरवेळी अशा घटना घडल्यानंतर फक्त ‘चौकशी’चं नाटक होतं. याची जबाबदारी कोण घेणार? विकास हवाय, पण तो मुंबईकरांच्या जीवावर बेतणारा नको, असे त्या म्हणाल्यात.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. सीएमओने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मुंबईतील मुलुंड भागात मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून इतर काही जखमी झाले आहेत. या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले असून या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मृताच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार देईल आणि जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Mumbai Metro Slab Collapse in Mulund: 1 Dead, 3 Injured on LBS Road

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात