विशेष प्रतिनिधी
मालेगाव : Malegaon नवनिर्वाचित उपमहापौर शान ए हिंद यांनी महापालिका मुख्यालयातील आपल्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावल्याने याचे तीव्र पडसाद उमटले. शिवसेनेने शुक्रवारी आक्रमक भूमिका घेत आयुक्त रवींद्र जाधव यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. शनिवारी (१४ फेब्रुवारी) दुपारपर्यंत सामोपचाराने हा फोटो काढण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्यानंतर सेना पदाधिकारी व नगरसेवक परतले.Malegaon
महापालिका मुख्यालय इमारतीतच महापौर व उपमहापौर यांची स्वतंत्र दालने आहेत. टिपू सुलतानची प्रतिमा लावलेल्या शान ए हिंद यांच्या दालनाचा फोटो शुक्रवारी सकाळपासून समाज माध्यमांवर चर्चेत होता.Malegaon
सेना पदाधिकारी व नगरसेवक यांनी दुपारी थेट आयुक्त रवींद्र जाधव यांचे कार्यालय गाठले. शासकीय इमारतीतील प्रोटोकॉल नुसार फोटोंची माहिती विचारली तसेच टिपू सुलतान यांचा फोटो हटवण्याची मागणी केली. सायने बुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तसेच शिवस्मारकाचा प्रस्ताव पहिल्याच महासभेत महापौर नसरीन शेख यांनी ठेवला आहे. याचे सेना पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले. आयुक्त जाधव यांनी उपमहापौरांना सुचित करण्याचे सूचना नगरसचिव यांना दिली. ग्रामीण जिल्हाप्रमुख संजय दुसाने, तालुकाप्रमुख मनोहर बच्छाव, गटनेते नीलेश आहेर, युवा जिल्हाप्रमुख विनोद वाघ, नगरसेवक दिनेश ठाकरे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
उमरखेडच्या उर्दू शाळेमध्ये आक्षेपार्ह गाणे, गुन्हा दाखल
उमरखेड | येथील अब्दुल गफूर शहा नगरपालिका उर्दू शाळा क्रमांक २ मध्ये आक्षेपार्ह व धार्मिक भावना भडकावणारे गाणे वाजवल्याप्रकरणी उमरखेड पोलिसांनी मुख्याध्यापक व एका शिक्षकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १९६ (१)(सी) अंतर्गत १२ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App