नाशिक : एरवी कुठलेही विषय, कितीही कठीण आणि गहन असले, तरी ते शरद पवारच सोडवतात. महाराष्ट्रातल्या काय किंवा देशातल्या काय सगळ्या जगभरातल्या समस्यांची पवारांना जाण आहे. त्या सगळ्याच्या सगळ्या समस्यांची उत्तरे पवारांकडेच आहेत, अशा डिंग्या मारणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची एक वेगळीच राजकीय मजबुरी गेल्या दोन – तीन दिवसांमध्ये समोर आली. राष्ट्रवादीतली घोटाळखोरी आणि सगळे “पवार संस्कारित” शरद पवारांच्या नव्हे, तर अमित शाहांच्या दारी!!, हे राजकीय चित्र घेण्यात दोन-तीन दिवसांमध्ये राजधानी दिसून आले.Scams in NCP; Everyone is at the door of “Pawar cultured” Amit Shah!!
अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन सुद्धा त्या पक्षातल्या घोटाळखोर नेत्यांच्या अडचणी कमी झाल्या नाहीत. उलट त्या वाढल्या. खुद्द अजित पवारांच्या नेतृत्वाला घरघर लागली. कारण पार्थ पवारचा जमीन घोटाळा उघड्यावर आला. त्या पाठोपाठ माणिकराव कोकाटे यांना बनावट कागदपत्रे देऊन फ्लॅट लाटण्याचा फटका 30 वर्षांनंतर बसला. त्यांना कारावासाची शिक्षा झाली. अटक होईल आणि मंत्रिपद जाईल, या भीतीने ते आजारी पडले. ते लीलावतीत दाखल झाले.
– सुप्रिया सुळेंबरोबर पाच खासदार अमित शाहांकडे
या सगळ्या मोठ्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच खासदार परवाच अमित शाहांच्या भेटीला पोहोचले. त्यांना अचानक आपापल्या मतदारसंघांमध्ये “अतिमहत्त्वाची” कामे आठवली, की जी शरद पवार नव्हे, तर फक्त अमित शाहाच सोडवू शकतात, असे त्यांना वाटले. म्हणूनच खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली “पवार संस्कारित” खासदारांनी अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. त्यांना वेगवेगळी कामे करायची विनंती केली.
केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे राज्यातील विविध प्रश्न मांडले. यामध्ये मस्साजोग, जि. बीड येथील सरपंच स्व संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोरात शासन व्हावे ही मागणी मांडली. बीड जिल्ह्यातील स्व महादेव मुंडे यांच्या खूनप्रकरणी तपासात कसलीही… pic.twitter.com/vsOcNPZvf4 — Supriya Sule (@supriya_sule) December 16, 2025
केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे राज्यातील विविध प्रश्न मांडले.
यामध्ये मस्साजोग, जि. बीड येथील सरपंच स्व संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोरात शासन व्हावे ही मागणी मांडली. बीड जिल्ह्यातील स्व महादेव मुंडे यांच्या खूनप्रकरणी तपासात कसलीही… pic.twitter.com/vsOcNPZvf4
— Supriya Sule (@supriya_sule) December 16, 2025
– सुनील तटकरे भेटीला
त्यांच्यापाठोपाठ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे अमित शहा यांच्या भेटीला गेले महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकांमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी यांनी आतून किंवा बाहेरून एकत्र येण्यासंदर्भात तटकरे यांनी अमित शाह यांची परवानगी मिळवली निदान तशी बातमी पवार बुद्धीच्या माध्यमांनी दिली.
आज नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री आदरणीय श्री. अमित भाई शहा यांची भेट घेऊन परळी वैद्यनाथ स्थित प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थ स्थळाचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत समावेश करण्याबाबत विनंती केली. या योजनेच्या माध्यमातून ज्योतिर्लिंग स्थळाचा विकास व कायाकल्प… pic.twitter.com/xr5IqIskwo — Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 17, 2025
आज नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री आदरणीय श्री. अमित भाई शहा यांची भेट घेऊन परळी वैद्यनाथ स्थित प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थ स्थळाचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत समावेश करण्याबाबत विनंती केली. या योजनेच्या माध्यमातून ज्योतिर्लिंग स्थळाचा विकास व कायाकल्प… pic.twitter.com/xr5IqIskwo
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 17, 2025
– धनंजय मुंडेंची भेट
णिकराव कोकाटे यांच्या अटकेचा मुहूर्त अमित शाहांच्या भेटीसाठी गाठला. त्यामुळे माणिकराव कोकाटे जर फडणवीसांच्या मंत्रिमंडळातून बाहेर जाणार असतील तर आपला त्या मंत्रिमंडळात पुन्हा नंबर लागावा, यासाठी मुंडे यांनी अमित शाहांचे उंबरठे झिजवल्याची बातमी मराठी माध्यमांनी चालविली.
आज नवी दिल्ली येथे देशाचे केंद्रीय गृहमंत्री मा. श्री. अमितजी शाह यांची भेट घेतली. यावेळी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळे येथे २० मार्च १९२७ रोजी केलेल्या ऐतिहासिक सत्याग्रह आंदोलनाला २०२७ साली शंभर वर्ष पूर्ण होत आहे. ‘चवदार तळे सत्याग्रह’… pic.twitter.com/Ly0x1GaJbv — Sunil Tatkare (@SunilTatkare) December 16, 2025
आज नवी दिल्ली येथे देशाचे केंद्रीय गृहमंत्री मा. श्री. अमितजी शाह यांची भेट घेतली. यावेळी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळे येथे २० मार्च १९२७ रोजी केलेल्या ऐतिहासिक सत्याग्रह आंदोलनाला २०२७ साली शंभर वर्ष पूर्ण होत आहे. ‘चवदार तळे सत्याग्रह’… pic.twitter.com/Ly0x1GaJbv
— Sunil Tatkare (@SunilTatkare) December 16, 2025
एरवी हेच सगळे पवार संस्कारित नेते शरद पवारांच्या घरी जाऊन आपापले प्रश्न सोडवत किंवा मिटवून घेत असत, पण आता या सगळ्यांना वेगवेगळ्या कारणांसाठी किंवा आपली घोटाळाखोरी बाहेर येऊन आपल्याला त्रास होऊ नये, या हेतूसाठी अमित शहांची भेट घ्यावी लागली. अमित शाह यांनी या सगळ्यांना भेट दिली, पण त्यांच्याकडून आलेल्या अधिकृत पत्रकांशिवाय बाकी कुठली कामे करण्याची आश्वासने त्यांना दिली नाहीत किंवा त्यांच्या कुठल्याही भेटीची दाखल आपल्या स्वतःच्या सोशल मीडिया हँडलवर घेतली नाही. आम्हीच अमित शाहांना जाऊन भेटलो, अशी ट्विट सुप्रिया सुळेंसकट बाकीच्या खासदारांनी आणि पवार संस्कारित नेत्यांनी स्वतःच्या सोशल मीडिया हँडलवर केली.
पवार संस्कारित नेत्यांच्या या राजकीय कृतीमुळे राष्ट्रवादीच्या राजकारणात आता खुद्द पवारांच्या राजकीय महत्त्वापेक्षा अमित शाहांचे महत्त्व जास्त वाढले, हेच यातून स्पष्ट झाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App