हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूरातून एकनाथ शिंदेंची विदर्भ + मराठवाड्यात राजकीय मुशाफिरी

Eknath Shinde'

विशेष प्रतिनिधी

नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूर मध्ये राहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भ आणि मराठवाड्यात मोठे राजकीय मुशाफिरी केली. त्यांनी अनेक पक्षांतून अनेक कार्यकर्ते कडून आपल्या शिवसेनेत घेतले.Eknath Shinde’s political tour of Vidarbha + Marathwada from Nagpur on the occasion of the winter session

यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा शहरातील समता परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि यवतमाळ काँग्रेस कमिटीचे सदस्य राजेंद्र घाटे, पंकज शेंदुरकर, सुनील राऊत, प्रवीण महल्ले, विजय उडारवे, विनोद शेंदुरकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

दारव्हा ग्रामीण मधून एपीएमसी संचालक सतीश शेटे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुधीर मालानी, माजी एपीएमसी सदस्य घनश्याम पावडे, काँग्रेसचे माजी अध्यक्ष पुंडलिक भुरे, शाखाप्रमुख भूषण धादोड, उबाठा विभागप्रमुख गोपाल गायकवाड, सुभाष काकडे, सुरेंद्र बोरसरे, उत्कर्ष ठाकरे, स्वप्नील भोकरे, भगवान कळंबे, अक्षय धारणे, नयन बन, रमेश बारलावार यांनी देखील याप्रसंगी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.



यासोबतच अमरावती जिल्ह्यातील उबाठा गटाच्या माजी नगरसेविका सौ.मंजुषा जाधव, माजी नगरसेवक भारत चौधरी, माजी नगरसेवक भारत जावंजाळ, माजी शहरप्रमुख प्रशांत जाधव, प्रवीण संगवई, वर्धा येथील उबाठा गटाच्या संपर्कप्रमुख कांचनताई ठाकूर, तसेच वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील सुरेश मोरे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

यासोबतच आमदार किशोर दराडे, आमदार नरेंद्र दराडे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातील असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार किशोर दराडे, आमदार नरेंद्र दराडे, शिवसेना सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ, शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

– मराठवाड्यातून शिवसेना प्रवेश

बीड जिल्ह्याचे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सरचिटणीस आणि विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल टेकाळे, बीड विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश डरफे, किशोर ढाकणे, नागनाथ शिंगण यांनी काल शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

शिवसेनाप्रमुख बाबासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेले ज्येष्ठ शिवसैनिक विश्वनाथ खताते यांची याप्रसंगी शिवसेना ज्येष्ठ नागरिक कक्षाच्या राज्य समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली.

यावेळी उबाठा गटाचे धाराशिव जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष आणि धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव जिल्हा बँकेचे संचालक डॉ.संजय कांबळे, शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष मालोजी पाटील, रमेश भालेकर, हनुमंत जाधव, अरुण मुंढे व असंख्य पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला.

तसेच शिवसेना विधी संघटना विदर्भ प्रदेश ऍड. विनीतकुमार रूडे, ऍड. महेश राठोड, ऍड. बुरानुल शेख आणि त्यांच्यासह ४५ वकिलांनी देखील शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.

यावेळी शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी, बीड शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, सचिन मुळूक, ऍड. ध्वनील गलधर तसेच बीड, धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

Eknath Shinde’s political tour of Vidarbha + Marathwada from Nagpur on the occasion of the winter session

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात