लंडन मध्ये बेकायदा स्थलांतरांविरुद्ध लाखो ब्रिटिशांचा मोर्चा; पण बेकायदा स्थलांतरितांमध्ये सर्वाधिक पाकिस्तान्यांचा भरणा!!

नाशिक : लंडनमध्ये बेकायदा स्थलांतरांविरुद्ध लाखो ब्रिटिशांचा मोर्चा; पण सर्वाधिक बेकायदा स्थलांतरित कोण??, वाचून बसेल धक्का!!, असं खऱ्या अर्थाने म्हणायची वेळ अधिकृत आकडेवारीमुळे आली आहे. London

लंडनमध्ये लाखो ब्रिटिशांनी एकत्र येऊन ब्रिटन मधल्या बेकायदा स्थलांतरितांच्या विरोधात प्रचंड मोर्चा काढला. ब्रिटनमध्ये बेकायदा स्थलांतरित येऊन धुमाकूळ घालतात. गुन्हे वाढवतात. सार्वजनिक शिस्त बिघडवतात. स्थानिकांच्या नोकऱ्या आणि रोजगार बळकावतात, असे आरोप मोर्चातील लोकांनी केले. अर्थात त्याला उजव्या विचारसरणीच्या पक्षाचा पाठिंबा मिळाला.

– आकडे बोलतात

पण “बेकायदा स्थलांतरित” या संकल्पनेत ब्रिटनमध्ये नेमके कोण बसते?? आणि कोणामुळे नेमक्या समस्या निर्माण झाल्यात??, याचा अहवाल ब्रिटनच्या संसदेत म्हणजेच हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये 1 सप्टेंबर 2025 रोजी सादर केला गेला. त्यातले तपशील प्रचंड धक्कादायक असल्याचे समोर आले. कारण ब्रिटनमध्ये घुसलेल्या बेकायदा स्थलांतरितांमध्ये 52 % आशियाई, 20 % आफ्रिकन, 16 % अमेरिकन आणि युरोपियन, 11 % अरब आणि उत्तर आफ्रिकन यांचा समावेश आहे.

– सर्वाधिक घुसखोर पाकिस्तानी

पण त्या पलीकडची आकडेवारी अधिक धक्कादायक आहे, ती म्हणजे 52% आशियाई लोकांमध्ये सर्वाधिक घुसखोर म्हणजेच बेकायदा स्थलांतरित पाकिस्तानी आहेत. त्यांच्यापाठोपाठ अफगाण आणि इराणी आहेत. त्याचबरोबर सिरीयन देखील आहेत. पाकिस्तानी, बांगलादेशी, अफगाणी, इराणी आणि सिरीयन घुसखोरांनी म्हणजेच बेकायला स्थलांतरितांनी मूळच्या ब्रिटन मधल्या ब्रिटिशांचे जीवन हराम केले आहे. त्यांच्यामुळे ब्रिटन मधल्या गंभीर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. ब्रिटिश मुली आणि स्त्रियांवर बलात्कार करणे, त्यांना धमक्या देऊन घरे बळकावणे, वृद्धांवर हल्ले करणे, झुंडशाही करून विशिष्ट परिसरात धुडगूस घालणे, लुटालूट करणे, धार्मिक उन्माद पसरविणे, अशा अनेक गुन्ह्यांमध्ये हे घुसखोर म्हणजेच बेकायदा स्थलांतरित सामील आहेत. हे वक्तव्य कुठल्या वृत्तवाहिनीचे किंवा ब्रिटिश वृत्तपत्राचे नाही, तर हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये सादर झालेल्या अहवालात ते नमूद केले आहे.

– बेकायदा स्थलांतरित किती??

2024 मध्ये ब्रिटनमध्ये आश्रय मागण्यासाठी 84,200 जणांनी अर्ज केला, तर 2025 मध्ये हाच आकडा 88, 700 आणि 111,100 पर्यंत पोहोचला. ब्रिटिश संसदेत हे आकडे जाहीर झाल्यानंतर यातल्या बहुसंख्यांनी आश्रय मागण्यासाठी अर्ज केले. याचाच अर्थ ते आधी घुसखोरी करून ब्रिटनमध्ये शिरले होते. पकडले गेल्यावर त्यांनी आश्रय मागण्यासाठी अर्ज दाखल केले. जून 2025 मध्ये 22,7000 स्थलांतरित ब्रिटनमध्ये आल्याचे सांगितले जाते. तसे अहवालात नमूद केले आहे. ब्रिटनची लोकसंख्या 6.8 कोटी आहे. त्यामध्ये 7,45000 एवढे बेकायदा स्थलांतरित आहेत. त्यापैकी एकट्या लंडन मध्ये 5,85500 एवढे बेकायदा स्थलांतरित आहेत.

People gathered on the streets of London in anti-immigration protests and headed towards Westminster

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात