Kunal Kamra पोलिसांसमोर चौकशीला यायला “लाल संविधानी” कुणाल कामराची फाटली; पण नव्या गाण्यातून पुन्हा उडवली खिल्ली!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : हातामध्ये लाल संविधान घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विडंबनात्मक काव्यातून खिल्ली उडवणाऱ्या कुणाल कामराला पोलिसांनी समन्स पाठवले, तर त्या चौकशीला सामोरे जाण्याच्या ऐवजी तो अजूनही बिळात लपूनच बसला. पोलिसांसमोर यायला त्याची फाटली, पण त्याने दुसऱ्या गाण्यातून पुन्हा एकदा खिल्ली उडवली.

कुणाल कामराने ठाण्याचा रिक्षावाला, गद्दार अशा भाषेत एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवल्यानंतर शिवसैनिकांचा संताप उफाळून आला. त्यांनी कुणाल कामराला घेरले. त्याच्याविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये एफआयआर दाखल झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कुणाल कामराला कायद्याच्या चौकटीत अडकवण्याची घोषणा केली. विडंबन काव्याच्या नावाखाली कोणाचाही अपमान सहन करणार नाही, अशी भूमिका फडणवीस यांनी जाहीर केली. त्यामुळे अटकेच्या भीतीने कुणाला कामरा मुंबईत राहिलाच नाही. तो तिथून तामिळनाडूत पळून गेल्याची बातमी आली. त्याने फोन स्विच ऑफ केला.

पण खार पोलिसांनी त्याला चौकशी आणि तपासासाठी समन्स पाठवले. त्यावर कुणाल कामराने वकिलामार्फत आठवड्याची मुदत मागितली. एका आठवड्यानंतर आपण पोलीस ठाण्यात हजर राहू असे त्याने वकिलामार्फत पोलिसांना कळवले, पण त्याने खोडसाळपणा सोडला नाही. त्याने लगेच दुसरे गाणे आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून शेअर केले. त्यामध्ये त्याने हम होंगे कामयाब गाण्याचे विडंबन केले. हम होंगे कंगाल असे म्हणत नथुराम, आसाराम, संघ असा शाब्दिक धुमाकूळ घालून अविष्कार स्वातंत्र्याचा नंगानाच केला.

Kunal Kamra The new song has been mocked again

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात