विशेष प्रतिनिधी
मुंबई : अजित पवारांना महायुतीच्या सत्तेच्या वळचणीला आणून भाजप – शिवसेना महायुतीला लाभ होण्याऐवजी डोक्याला तापच झाला आहे. लोकसभा निवडणुकीत तर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा भाजप किंवा शिवसेना यांना लाभ होण्याऐवजी तोटाच झाला, हे आकड्यांनी सिद्ध केले, पण नॅरेटिव्ह सेटिंगमध्ये देखील अजितदादांच्या राष्ट्रवादीचा लाभ महायुतीला होण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचा उपद्रव महायुतीच्या घटक पक्षांना सहन करावा लागत आहे.
अमोल मिटकरी आणि मनसे यांच्या भांडणात याचे प्रत्यंतर आले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दुसरे उपमुख्यमंत्री पुण्यात नसताना खडकवासला धरण भरले, असा टोमणा अजितदादांचे नाव न घेता मारला. याचा राग येऊन अमोल मिटकरींनी सुपारीबाज राज ठाकरे यांनी अजितदादांवर बोलू नये, असा टोमणा हाणला.
या टोमणेबाजीतून अजितदादांची राष्ट्रवादी आणि मनसे नेत्यांचे भांडण जुंपले. अकोल्यात मनसैनिकांनी अमोल मिटकरींची गाडी फोडली. यात एका मनसैनिकाचा अचानक बळी गेला. वातावरण तापले. मनसैनिकांनी अमोल मिटकरींना दमबाजी केली. मिटकरींनी पण मनसैनिकांना दमबाजी केली. दोन्ही बाजूंनी भांडण वाढले.
पण आता या वादात नसलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अमोल मिटकरींनी अकारण वादात ओढले. महायुतीचा घटक म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी विचारपूस करायला हवी होती. मी हतबल नाही, पण मला मुख्यमंत्र्यांनी फोन करायला हवा होता. सत्ताधारी असो किंवा विरोधक असोत, लावारिस गुंड जेव्हा हल्ला करतात, तेव्हा मुख्यमंत्री पदावर बसलेल्या नेत्यांनी चौकशी करायला पाहिजे होती, असे वक्तव्य अमोल मिटकरींनी केले. राष्ट्रवादी आणि मनसे यांच्या भांडणात मिटकरींनी अकारण मुख्यमंत्र्यांना ओढले. यामुळे महाविकास आघाडीच्या पक्षांच्या हातात आयते कोलीत मिळाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App