अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार; ट्रम्प म्हणाले- गोळी कानावर लागली; 1 संशयित हल्लेखोर ठार

Shooting at former US President Donald Trump; Trump said - the bullet hit the ear; 1 suspected attacker killed

वृत्तसंस्था

पेन्सिल्व्हेनिया : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे एका रॅलीत ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आला. बटलरमध्ये ते मंचावर बोलत असताना बंदुकीच्या गोळीचा आवाज आला. ट्रम्प यांनी उजव्या कानावर हात ठेवला आणि खाली वाकले. सीक्रेट सर्व्हिस एजंट ट्रम्प यांना कव्हर करण्यासाठी तातडीने त्यांच्याजवळ पोहोचले. Shooting at former US President Donald Trump; Trump said – the bullet hit the ear; 1 suspected attacker killed

सुरक्षा रक्षकांनी डोनाल्ड ट्रम्प यांना उभे राहण्यास मदत केली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आणि कानावर रक्त दिसत होते. यावेळी ट्रम्प यांनी आपली मुठ घट्ट धरली आणि ती हवेत हलवली. त्यानंतर गुप्तहेरांनी ट्रम्प यांना स्टेजवरून उतरवून कारच्या मदतीने रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली.

या घटनेविषयी ट्रम्प यांनी सांगितले की, त्यांच्या उजव्या कानाच्या वरच्या भागात गोळी लागली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले की, मला कानाजवळ एक आवाज जाणवला, त्यामुळे काहीतरी चुकीचे घडल्याची बाब लगेच माझ्या लक्षात आली. खूप रक्तस्त्राव झाला. त्यानंतर काय घडले ते कळाले.



अध्यक्ष बायडेन डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलले

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या घटनेच्या सुमारे 4 तासांनंतर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केली. व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की अध्यक्ष बायडेन यांनी माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, पेनसिल्व्हेनियाचे गव्हर्नर जोश शापिरो आणि बटलरचे महापौर बॉब डँडॉय यांच्याशीही चर्चा केली.

व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की, राष्ट्राध्यक्ष आज वॉशिंग्टन डीसीला परतत आहेत. ते रविवारी सकाळी व्हाईट हाऊसमध्ये होमलँड सिक्युरिटी आणि लॉ एन्फोर्समेंट एजन्सीच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतील.

ट्रम्प यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, रिपब्लिकन राष्ट्रीय अधिवेशनाला जाण्याची शक्यता

मीडिया रिपोर्ट्सनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाला आहे. ट्रम्प आता कुठे जाणार आहेत याबाबत सध्या कोणतीही माहिती नाही. पण ते या रॅलीनंतर न्यू जर्सी येथील त्यांच्या प्रॉपर्टी बेडमिन्स्टर येथे जाणार होते. ट्रम्प रविवारी मिलवॉकी, विस्कॉन्सिनलाही जाणार आहेत. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन सोमवारपासून येथे सुरू होत आहे.

Shooting at former US President Donald Trump; Trump said – the bullet hit the ear; 1 suspected attacker killed

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात