विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होण्याअगोदरच विधानसभा निवडणुकीत भाजपकडून जास्त जागा मारण्याचा फंदात पडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सीनियर मोस्ट नेते छगन भुजबळ यांना भाजपच्या ज्युनियर नेते निलेश राणे यांनी फटकारले. त्यामुळे छगन भुजबळ आज नरमले!! BJP’s junior leader got angry, NCP senior most leader reletens
छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन बैठकीत आपल्याच नेत्यांना भाजप नेत्यांची झालेल्या वाटाघाटींची आठवण करून दिली होती. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला पाचच जागा आल्या. तसे विधानसभा निवडणुकीत होऊ देऊ नका. भाजपने आपल्याला 80-90 जागा देण्याचे आश्वासन दिले आहे. ते आश्वासन त्यांच्याकडून पूर्ण करून घ्या. सावध राहा, असे वक्तव्य भुजबळ यांनी केले होते.
परंतु लोकसभा निवडणुकीचे मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच भुजबळ यांनी ते वक्तव्य केल्याने भाजपमध्ये अस्वस्थतेची लाट पसरली. महायुतीत जागावाटपाच्या वादाची ठिणगी पडली, अशा बातम्या आल्या.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमध्ये भाजपच मोठा पक्ष आहे. त्यामुळे सर्वाधिक जागा भाजपच लढवणार, असे स्पष्ट केले. त्यानंतर आज भाजपचे नेते निलेश राणे यांनी सोशल मीडिया अकाउंट वरून छगन भुजबळ यांना फटकारले. मी खूप जूनियर नेता आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी छगन भुजबळ यांच्यासारखे सीनियर नेत्याला आवरावे. भाजपने किती काळ असे सहन करायचं??, असा सवाल निलेश राणे यांनी केला.
भाजपमधून सीनियर मोस्ट नेते देवेंद्र फडणवीस आणि ज्युनिअर नेते निलेश राणे यांच्याकडून तीव्र प्रतिक्रिया आल्यानंतर छगन भुजबळ आज नरमले. महायुतीमध्ये भाजपच मोठा पक्ष आहे. त्यामुळे त्यांनाच जास्ती जागा मिळणार हे मला मान्य आहे. भाजपला सोडून आम्हाला जास्ती जागा द्या, असे म्हणायला मी वेडा नाही. मी फक्त भाजपने दिलेल्या आश्वासनाची आठवण पक्षाच्या बैठकीत करून दिली होती. मी बाहेर कुठेही काही बोललो नाही, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी व्यक्त केली.
पण या सगळ्यात भाजपच्या ज्युनिअर नेत्याने फटकारले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सीनियर मोस्ट नेते नरमले, अशीच चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App