पतियाळा येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले
विशेष प्रतिनिधी
पतियाळा : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे वरिष्ठ नेते दावा करत आहेत, की येत्या काही दिवसांत गुलाम काश्मीर भारताचा भाग होणार आहे. काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे आज गुलाम काश्मीर भारताचा भाग नाही, असे भाजप सातत्याने सांगत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-पाकिस्तान १९७१ च्या युद्धाचा उल्लेख केला आहे.But Kartapur Sahib you are here What mistake did the Congress commit in 1971 in the song of Modi
पतियाळा येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, त्यावेळी मी पंतप्रधान असतो तर करतारपूर साहिब आपला भाग असता.
काँग्रेसवर निशाणा साधताना मोदी म्हणाले, मी काँग्रेसवाल्यांना सांगतो की, बांगलादेशचे युद्ध झाले तेव्हा पाकिस्तानच्या ९० हजारांहून अधिक सैनिकांनी आत्मसमर्पण केले होते, ९० हजारांहून अधिक पाकिस्तानी सैनिक आमच्या ताब्यात होते. हुकुमाचा पत्ता आपल्या हातात होता.
“त्यावेळी मोदी असते तर मी त्यांच्याकडून करतापूर साहिब घेतले असते आणि तेव्हाच मी सैनिकांना सोडले असते. ते करू शकले नाहीत, पण माझ्याकडून होईल तेवढी सेवा मी केली. आज तुमच्यासमोर करतारपूर साहिब कॉरिडॉर आहे.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App