मुख्यमंत्री शिंदे यांचे कडक कारवाईचे आदेश Video of Pune car accident accused drinking alcohol goes viral
विशेष प्रतिनिधी
पुणे : पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अपघातापूर्वीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये तो दारू पिताना दिसत आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
कार अपघातातील आरोपी वेदांत अग्रवाल याला अवघ्या पंधरा तासांत जामीन मंजूर झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या रस्ता अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. आरोपीचे वडील विशाल अग्रवाल हे ब्रह्मा रियल्टीचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. याप्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे आयुक्तांशी चर्चा केली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी कार अपघातातील दोषींवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.
पुणे कार अपघात प्रकरणावर, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, “एफआयआरमध्ये 5 आरोपी होते, त्यापैकी 3 आरोपींना आम्ही रात्री उशीरा अटक केली. त्यांना आम्ही न्यायालयात हजर करू. आरोपीचे वडील फरार असून त्यांनाही ताब्यात घेतले जाईल.”
पोलिस सूत्रांनी सांगितले की, पोर्शे कार एक अल्पवयीन मुलगा चालवत होता. गाडी भरधाव वेगात होती. कारचा वेग ताशी 150 किलोमीटरहून अधिक होता. भरधाव वेगात आलेल्या कारने दुचाकीला धडक दिली असता त्यावर स्वार असलेले दोघे जण जखमी झाले. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. पुण्यातील कल्याणीनगर भागात हा अपघात झाला. अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा अशी मृतांची नावे आहेत.
यापूर्वी पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले होते की, त्यांच्याकडे दोन रेस्टॉरंटचे सीसीटीव्ही फुटेजही आहेत, ज्यामध्ये शनिवारी रात्री उशीरा हा मुलगा मित्रांसोबत दारू पीत असल्याचे दिसून येते. पुण्याच्या ससून सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर अवधिया आणि कोष्टा यांचे मृतदेह मध्य प्रदेशातील पाली आणि जबलपूर या त्यांच्या गावी नेण्यात आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App