नातू वेदांत अग्रवालचा हवाला देणाऱ्या आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांचा छोटा राजनशी संबंध; एका खुनात गुन्हा दाखल!!

विशेष प्रतिनिधी

पुणे : पोर्शे नावाची आलिशान कार बेफामपणे चालवून दोघांचे बळी घेणारा वेदांत अग्रवाल याचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांचे छोटा राजनशी संबंध असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे, इतकेच काय, पण पुण्यातल्या एका खूनाशी त्यांचा संबंध असून त्यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल झाला होता. pune porche car accident

अग्रवाल कुटुंबीयांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आलं असून विशाल अग्रवाल यांचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी संबंध असल्याची माहिती उघड झाली आहे. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे. पुण्यात दारूच्या नशेत गाडी चालवून दोन जणांचा जीव घेणाऱ्या वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या कुटुंबीयांची छोटा राजनसोबत संबंध असल्याचं उघड झाले.

खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांचा वरदहस्त

भावांसोबत असलेल्या संपत्तीच्या वादात वेदांत अग्रवालच्या आजोबांनी छोटा राजनची मदत घेतली होती. या प्रकरणी अजय भोसले नावाच्या व्यक्तीच्या हत्येच्या प्रयत्नामध्ये सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्याविरोधात बंड गार्डन पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल असल्याचे प्रकरण समोर आले.

मात्र या प्रकरणात “मोक्का” कायदा लावणे अपेक्षित असनाताही पुणे पोलीसांनी केवळ आयपीसीची कलमं लावून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. आरोपत्रही दाखल करेपर्यंत विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना अटक झाली नव्हती.

नातवाची हमी देणाऱ्या आजोबांचे अंडरवर्ल्ड संबंध

याच सुरेंद्र अग्रवाल यांनी वेदांत अग्रवालची हमी दिली होती. पण आता त्यांचे छोटा राजनशी संबंध असल्याचे समोर आल्यानंतर पोलिस आणि न्यायालय सुरेंद्रकुमार अग्रवाल यांच्या हमी संदर्भात नेमका काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सुरेंद्र अग्रवालांचे संबंध हे थेट छोटा राजनशी संबंध असल्याचे हे प्रकरण काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या 2007-08 या काळातले आहे. मुंबई सत्र न्यायालयात छोटा राजनशी संबंधित सर्व प्रकरणं सीबीआयकडे हस्तक्षेप करण्यात आली होती. त्यामध्ये या प्रकरणाचा समावेश आहे.

या प्रकरणी सुरेंद्र अग्रवाल यांनी छोटा राजनचा हस्तक असलेल्या विजय तांबट याची बँकॉक येथे जाऊन भेट घेतली होती. भावासाोबत असलेल्या संपत्तीच्या वादात राजनने आपल्याला मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. नंतर अजय भोसले या व्यक्तीच्या खुनाच्या प्रयत्नात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात पोलिसांनी मोक्का लावणे अपेक्षित असताना फक्त आयपीसी कलम लावण्यात आले होते. चार्जशीट दाखल होईपर्यंत सुरेंद्र अग्रवाल यांना अटकही करण्यात आली नव्हती. नंतर छोटा राजनला भारतात आणल्यानंतर त्याच्याशी संबंधित सर्व प्रकरणं ही सीबीआयकडे ट्रान्सफर करण्यात आली. त्यामध्ये सुरेंद्र अग्रवालांचे हे प्रकरण असल्याचे आता उघड झाले आहे.

pune porche car accident

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात