‘भाजपा मित्रपक्षांसोबत ४००+ साठी काम करत आहे, अन् काँग्रेसला ‘इंडी’ आघाडीही सांभाळता येत नाही’

नागालँडचे मुख्यमंत्री नेफियु रिओ यांनी लगावला टोला!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : NDPP नागालँडच्या लोकांच्या विश्वासाशी आणि अस्मितेशी कधीही तडजोड करणार नाही. असे नागालँडचे मुख्यमंत्री नेफियु रिओ यांनी म्हटले आहे. नागालँडमधील लोकांसाठी एनडीपीपीचे चुंबेन मेरी हे योग्य उमेदवार असल्याचे रिओ म्हणाले.Nagaland Chief Minister Nephiu Rio criticized the Congress while praising the BJP



वास्तविक, सोमवारी पीपल्स डेमोक्रेटिक अलायन्सची (पीडीए) बैठक झाली. याच कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले की, नागालँडमध्ये काँग्रेसचा एकही आमदार नाही. असे असतानाही ते राज्यातील एकमेव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ते भाजपवर अल्पसंख्याक विरोधी आणि ख्रिश्चनांचा छळ करत असल्याचा आरोप करतात, मात्र यापैकी काही खरे आहे की नाही माहीत नाही. परंतु बाकीचा केवळ अपप्रचार आहे.

नागालँडचे मुख्यमंत्री म्हणाले की NDPP नेहमीच अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी आणि ख्रिश्चनांच्या कल्याणासाठी उभा राहील. नागालँड हे संसाधन मर्यादित राज्य आहे. केंद्र सरकारवर अवलंबून राहावे लागेल. केंद्राची कल्याणकारी धोरणे कौतुकास्पद आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खूप दूरदर्शी नेते आहेत. त्यांनी नेहमीच समान विकासाचा विचार केला आहे. भाजप स्वबळावर 300 हून अधिक जागा आणि मित्रपक्षांसह 400 हून अधिक जागा जिंकण्यासाठी काम करत आहे. त्याचवेळी काँग्रेसची अवस्था अत्यंत बिकट आहे, ते इंडी आघाडीची काँग्रेससोबतची युतीही सांभाळू शकलेली नाहीत. असं त्यांनी म्हटले आहे.

Nagaland Chief Minister Nephiu Rio criticized the Congress while praising the BJP

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात