भाजपचा उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार
विशेष प्रतिनिधी
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षांना कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटही सक्रीय झाला असून, आपलं राजकीय बळ दाखवण्यासाठी प्रयत्नशील झाला आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कोकणातील कुडाळ येथे सभा घेतली. ज्यामध्ये अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. शिवाय भाजपवरही निशाणा साधला. तर आता उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपनेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.BJP strongly criticizes Uddhav Thackeray
भाजपने ट्वटीद्वारे म्हटलं आहे की, ‘मुख्यमंत्री असताना कोकणातील मराठी माणसाला वाऱ्यावर सोडणाऱ्या उद्धव ठाकरेंना निवडणुका तोंडावर असताना कोकणाची आठवण झाली. उद्धव ठाकरे तुम्ही फक्त भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता, प्रत्यक्ष कृतीत मात्र तुम्हाला औरंग्याबद्दलचं प्रेम दिसून येतं.’
भाजपचं सुरूवातीपासून भगव्यावर प्रेम आहे आणि कायम राहणार. सत्तेसाठी सोनिया सेनेपुढे गुडघे टेकून भगव्याला छेद देण्याचं पाप कुणी केलं? हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे.
देवेंद्र फडणवीसांना पाव उपमुख्यमंत्री म्हणून टीका करण्याआधी तुमच्या शिल्लक सेनेची काय अवस्था झाली ते बघा. सच्चा शिवसैनिकानं तुमची साथ कधीच सोडलीय. आता तुमच्याकडे पाव सेनाही उरलेली नाही.’ असं भाजपने म्हटलं आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App