विशेष प्रतिनिधी
अयोध्या : अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाची युद्ध पातळीवर तयारी सुरु आहे. रामलल्ला 22 जानेवारीला नव्याने बनवण्यात आलेल्या मंदिराच्या गर्भगृहात विराजमान होतील. रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेच्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मोठ्या व्यक्ती सहभागी होणार आहेत. 22 जानेवारीची तारीख जवळ येत असताना देशातले वातावरण प्रचंड उत्साही आहे, पण त्यामध्ये वादाची ठिणगी टाकायचे काम इत्तेहाद-ए-मिल्लत कौंसिल (IMC) प्रमुख मौलाना तौकीर रझा यांनी केले आहे.Maulana Taukeer Raza sparked the controversy
IMC प्रमुख मौलाना तौकीर रजा यांनी गुरुवारी टीवी 9 भारतवर्षला मुलाखत दिली. त्यात त्यांनी बाबरीच्या मुद्यावर आम्ही संयम दाखवला. पण ज्ञानवापीच्या विषयात आम्ही तसाच संयम दाखवू शकत नाही, असे नव्या वादाची ठिणगी टाकणारे वक्तव्य केले.
त्यावर अखिल भारतीय संत समितिचे महामंत्री स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी प्रत्युत्तर दिले. देश संविधानाने चालणार आहे. ज्ञानवापीचा वाद न्यायालयात आहे. यावर कुठल्याही पद्धतीच मतप्रदर्शन करण्यास कोर्टाने मनाई केली आहे, तरी देखील तौकीर रझा यांनी धमकीची भाषा वापरली. या धमकीची दखल घेऊन उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
तुमच्या पूर्वजांनी आमची मंदिरे तोडली
अयोध्या मुद्यावर आम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत कायदेशीर लढाई दिली. तिथे आम्ही जिंकलो. राम मंदिरासाठी तुम्ही सद्भावना चर्चेने तोडगा काढलेला नाही. तुमच्या पूर्वजांनी आमची मंदिर तोडली. तुम्ही आता आमच्या संयमाची परीक्षा पाहून नका. राजकारणाने आपली मर्यादा पाळली पाहिजे. धर्माने आपल्या मर्यादेत राहावे. धर्माच विवेचन करण्याचा अधिकार कुठल्याही राजकीय नेत्याला नाही, असे जितेंद्रानंद सरस्वती म्हणाले.*
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App