राहुल गांधींच्या “टीम” मधल्या खिसेकापूंची संख्याच नीट ठरेना; काल म्हणाले, 2 खिसेकापू; आज म्हणाले, 3 खिसेकापू!!

विशेष प्रतिनिधी

भरतपूर : काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधींच्या टीममधल्या खिसेकापूंची संख्याच नीट ठरेनाशी झाली आहे. कारण काल ते म्हणाले, 2 खिसेकापू आणि आज म्हणाले, 3 खिसेकापू!!  Rahul gandhi says khisekapu

राजस्थानातल्या प्रचार सभांमधून राहुल गांधींनी खिसेकापूंच्या संख्येचे कन्फ्युजन स्वतःच तयार केले आहे. काल बारमेरच्या सभेत बोलताना राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी हे दोन खिसेकापू असल्याचे सांगितले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी समोरू येतात. तुमच्याशी हिंदू – मुस्लिम सारख्या बाता मारतात आणि मागून गौतम अदानी येऊन तुमचा खिसा कापून नेतात, असा आरोप त्यांनी केला होता. पण खिसेकापूंची संख्या त्यांनी 2 एवढीच सांगितली होती.

आज मात्र राहुल गांधींनी त्यात कन्फ्युजन वाढविले. भरतपूरच्या सभेत बोलताना राहुल गांधींनी भारतात 3 खिसेकापू फिरत असल्याचे सांगितले. पहिला खिसेकापू समोरून येतो. तुमचे ध्यान इतरत्र भटकवतो. दुसरा खिसेकापू प्रत्यक्ष खिसा कापून निघून जातो आणि तिसरा खिसेकापू समाजातल्या इतर घटकांना खिसा कापल्याचे कळू नये म्हणून हातात काठी घेऊन उभा असतो.

तसे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्योगपती गौतम अदानी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे काम सुरू आहे. मोदी समोरून येतात. तुमच्याशी हिंदू – मुस्लिम, नोटबंदी, जीएसटी अशा बाता मारतात. मागून आदानी येऊन तुमचा खिसा कापून बटवा घेऊन जातात, पण त्याचवेळी अमित शाह हे समाजाचे ध्यान तुमच्याकडे जाऊ नये म्हणून हातात काठी घेऊन उभे राहतात आणि समाजाला काठी मारण्याची धमकी देतात. देशात सध्या हेच काम सुरू आहे.

याचा अर्थ राहुल गांधींच्या मनातच कन्फ्युजन आहे की देशात नेमके किती खिसेकापू आहेत?? पण राहुल गांधींच्या या तोंडी आरोपातून जरी कन्फ्युजन दिसत असले, तरी प्रत्यक्षात काल ईडीच्या कारवाईत नेमका खिसेकापू कोण होते?? हे सिद्ध झाले. नॅशनल हेराल्ड केस मध्ये तब्बल 751.9 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड आणि यंग इंडियन या कंपन्या नॅशनल हेरॉल्ड चालवत होत्या, यापैकी यंग इंडियन कंपनीत सोनिया आणि राहुल गांधींचे तब्बल 78 % शेअर्स आहेत. त्यांच्या कंपन्यांची 751.9 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त झाली आहे आणि प्रत्यक्ष तोंडी भाषणांमधून राहुल गांधी देशात 3 खिसेकापू वावरत असल्याचे बोलत आहेत.

Rahul gandhi says khisekapu

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात