नव्या संसद भवनातून नवभारताचा हुंकार; पण विरोधकांनी चालवलाय सावरकर – मोदींचा फुकट प्रचार!!

नव्या संसद भवनातून नवभारताचा हुंकार; पण विरोधकांनी चालवलाय सावरकर – मोदींचा फुकट प्रचार!!, हे शीर्षक वाचून नेमका विषय काय आहे??, अशी शंका वाचकांच्या मनात उत्पन्न होईल आणि त्यात काही गैर नाही. पण हे शीर्षक द्यायला तसेच कारणही घडले आहे. Modi government don’t connect savarkar and Modi to new parliament business, but the opposition does it well!!

येत्या 17 सप्टेंबर 2023 रोजी नवीन संसद भवनवर भारतीय तिरंगा ध्वजारोहणाचा भव्य कार्यक्रम होणार आहे. भारताच्या दृष्टीने ही ऐतिहासिक घटना आहे. कारण भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकालात नवीन संसद भवन तयार होऊन तेथे संसदेचे विशेष अधिवेशन 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर अशा 5 दिवसांमध्ये होणार आहे. 18 सप्टेंबर 1949 रोजी घटना समितीच्या बैठकीत “इंडिया दॅट इज भारत युनियन ऑफ स्टेट्स” या संदर्भातले घटना कलम 1 स्वीकारले होते.

या पार्श्वभूमीवर 18 ते 22 सप्टेंबर अशा 5 दिवसांचे विशेष अधिवेशन होत आहे. त्याच्या आदल्या दिवशी 17 सप्टेंबर रोजी विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी नव्या संसद भवनावर भारतीय तिरंगा ध्वजारोहण होईल. पण विरोधकांनी या दिवसाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचे निमित्त देऊन त्या दिवसाच्या ध्वजारोहणाला आक्षेप घेतला आहे.


नव्या संसदेत कर्मचाऱ्यांचा पेहराव बदलला; नोकरशहा नेहरू जॅकेट घालणार, शर्टमध्ये कमळाच्या फुलांची प्रिंट; मार्शल्सना मणिपुरी पगडी


वास्तविक सरकारने अधिकृत पातळीवर मोदींच्या वाढदिवशी नव्या संसदेवर ध्वजारोहण अशी कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. मात्र त्या दिवशी विश्वकर्मा जयंती आहे, ही वस्तुस्थिती अधोरेखित केली आहे आणि नेमका इथेच सावरकर – मोदी आणि त्यांचे फुकट प्रचारक!! हा मुद्दा अधोरेखित होतो.

नव्या संसद भवनाशी सरकारने नव्हे, तर विरोधकांनीच सावरकर आणि मोदींचा संबंध जोडला. 28 मे 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या संसद भवनाचे उद्घाटन केले. तेथे भारतीय राज्यव्यवस्थेचे प्रतीक म्हणून सेंगोल प्रतिष्ठापित केले. सरकारी पातळीवर नव्या संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमात सावरकर जयंतीचा बिलकुलच उल्लेख नव्हता. संसद भवनाच्या उद्घाटनाच्या धार्मिक कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जुन्या संसद भवनात जाऊन सावरकरांना आदरांजली अर्पित केली होती. त्या पलीकडे सरकारी पातळीवर सावरकर जयंतीचा कोणताही कार्यक्रम आयोजित केला नव्हता. पण विरोधकांनी स्वतःहूनच नव्या संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमाचा सावरकर जयंतीशी संबंध जोडला आणि सावरकरांचा भरपूर नकारात्मक पण प्रचार केला!!

विरोधकांनी सावरकरांचा नकारात्मक प्रचार केला, पण जनतेच्या दृष्टीने तो मोदींच्या पथ्यावरच पडला. कारण मोदींचे नाव आपोआप सावरकरांशी त्यामुळे जोडले गेले. सावरकर हे भारतातल्या हिंदुत्ववादाचे “फाउंटन हेड” आहेत, हे बिरुद त्यांना कोणत्याही हिंदुत्ववाद्यांनी दिलेले नाही, तर ते त्यांच्या वैचारिक विरोधकांनी दिले आहे आणि नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाशी सावरकरांचा संबंध मोदी सरकारने नव्हे,तर विरोधकांनीच जोडून टाकला आहे!!, ही फार मोठी राजकीय विसंगती आहे.

जे सावरकरांच्या बाबतीत घडले, तेच मोदींच्या बाबतीत घडत आहे. 17 सप्टेंबरला मोदींचा वाढदिवस आहे, हे खरेच. पण म्हणून नेमका तोच दिवस सरकारने नव्या संसद भवनावर ध्वजारोहणासाठी निवडला हा आरोप करणे मोदींसाठी नकारात्मक ठरण्याऐवजी सकारात्मकच ठरतो आहे. कारण सोशल मीडियात त्याचे पडसाद उमटताना ज्याने संसद बांधली त्याच्या वाढदिवशी ध्वजारोहण झाले तर गैर काय??, असे विरोधकांना बोचणारे सवाल विचारले गेले आहेत. वास्तविक सरकारने मोदींचा वाढदिवस आणि नव्या संसद भवनावर ध्वजारोहण यांचा संबंध एकमेकांशी जोडलेला नाही. त्यादिवशी फक्त विश्वकर्मा जयंती आहे, त्याचा संबंध जोडला आहे. पण मोदींचे विरोधक एवढे अंध आहेत की त्यांनी स्वतःहून पुढे येऊन संसद भवनाच्या ध्वजारोहणाशी मोदींचा वाढदिवस जोडून टाकला आहे!!

इथे सावरकर काय किंवा मोदी काय, त्यांचा विरोधकांनी फुकट प्रचार चालवला आहे ज्याची बिलकुलच गरज नव्हती, तो मुद्दा मोदी सरकारच्या आयता हाती आणून दिला आहे. आता त्याला मोदींचा नाईलाज आहे. कारण मोदी काही साधुसंत नव्हेत. तेही कसलेले राजकारणीच आहेत. त्यांनी विरोधकांच्या या नकारात्मक प्रचाराचा आपल्या राजकारणासाठी सकारात्मक वापर न करून घेतला तरच नवल!!

गेल्या 25 वर्षांपासून मोदी तेच करत आले आहेत. गुजरातच्या 15 वर्षांचा राजकारणाचा अनुभव आणि त्यानंतर केंद्रातला गेल्या 9 – 10 वर्षांमधला अनुभव नेमका हेच सांगतो आहे. विरोधकच सावरकर आणि मोदींचे फुकट प्रचारक बनले आहेत!! सावरकर – मोदींच्या खिशातल्या एक रुपयालाही चाट न लावता विरोधक त्यांना देशा-विदेशात स्वतःहून भरपूर प्रसिद्धी मिळवून देत आहेत. हे “राजकीय भाग्य” या देशात फक्त सावरकर – मोदींच्या वाट्याला आले आहे. ते इतरांच्या वाट्याला येणे सोपे नाही!!

Modi government don’t connect savarkar and Modi to new parliament business, but the opposition does it well!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात