”खोटं बोलणं , खोटं पसरवणं बंद करा, म्हणजे…” असंही भाजपाने सुप्रिया सुळेंना उद्देशून म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : सारथीच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या छत्रपती शाहू महाराज नॅशनल फेलोशिपच्या निधीत शासनाने कपात करून, मराठा समजावर अन्याय केला आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या(पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर ट्वीटद्वारे केला होता. मात्र त्यांनी हे ट्वीट नंतर डिलीट केले. परंतु भाजपाने त्यांचे हे ट्वीट पकडले आणि त्यावरून त्यांच्यावर निशाणा साधला. BJP criticizes NCP MP Supriya Sule
‘खोट्याच्या कपाळी सोटा’ समाजामध्ये तेढ निर्माण करणे, सरकारबद्दल खोटं पसरवून तरुणांची माथी भडकवणे आणि एकूणच कायदा व सुव्यवस्थेमध्ये अस्थिरता निर्माण करणे हेच का विरोधक म्हणून तुमचं काम होतं. असा सवाल भाजपाने केला आहे.
याशिवाय, ”ट्वीट करण्याआधी अडीचवर्षांच्या काळात तुम्ही सारथीसह किती योजना बासणात बांधल्या त्याबद्दल आठवलं नसेलच तुम्हाला. खोटं बोलणं , खोटं पसरवणं बंद करा, म्हणजे समाज माध्यमावर टाकलेल्या पोस्ट डिलीट करण्याची वेळ येणार नाही आणि तुमची नाचक्कीसुध्दा होणार नाही. “झुठ फैलाना होता है, आसान ये नौबत ना आती अगर करते कुछ काम” असं म्हणत भाजपाने सुप्रिया सुळेंना टोला लगावला आहे. भाजपाने सुप्रिया सुळेंच्या ट्वीटचा स्क्रीनशॉट काढून तो शेअर केला आहे.
सुप्रिया सुळेंनी ट्वीटमध्ये काय म्हटले होते ? –
खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीटद्वारे म्हटले होते की, ”सारथीच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या छत्रपती शाहू महाराज नॅशनल फेलोशिपच्या निधीत शासनाने कपात केली आहे. यावर्षी ही फेलोशीप केवळ ५० पात्र विद्यार्थ्यांनाच देण्यात येणार आहे. यापूर्वी हीच फेलोशीप ८५१ विद्यार्थ्यांना देण्यात येत असे. शासनाने फोलोशीपच्या संख्येत मोठी कपात करून मराठा समाजावर अन्याय केला आहे.”
”यासोबतच बार्टी,महाज्योती यांच्या आणि टीआरआटीआय यांच्या फेलोंची संख्याही कमी केली आहे. बार्टीच्या माध्यमातून यापूर्वी ८६१, महाज्योतीच्या माध्यमातून १२५० तर टीआरटीच्या माध्यमातून १४६ जणांना फेलोशीप दिली जायची. आता ही संख्या बार्टी साठी २००, महाज्योतीसाठी ५० तर टीआरटीआय साठी १०० इतकी कमी केली आहे. शासनाची ही कृती गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांची संधी हिसकावून घेणारी आहे. विशेषता याबाबत विद्यार्थी सातत्याने मागणी करत असतनाही शासन याला प्रतिसाद देत नाही, ही मोठी खेदजनक बाब आहे. मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने याची दखल घेऊन फेलोशीप पुर्ववत करावी ही आमची देखील आग्रही मागणी आहे. शासनाने यावर सकारात्मक विचार करून निर्णय घ्यावा.” असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App