भारत सरकारने औपचारिकता पूर्ण केली की संयुक्त राष्ट्रांच्या रेकॉर्ड्समध्ये देखील INDIA चे नाव बदलून BHARAT!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र संघाच्या नियमावलीनुसार भारताचे सरकार जेव्हा सर्व औपचारिकता पूर्ण करेल, तेव्हा संयुक्त राष्ट्र “यूएन रेकॉर्ड”मध्ये INDIA चे नाव बदलून BHARAT भारत करेल”, असे संयुक्त राष्ट्र संघाच्या महासचिवांचे मुख्य प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी स्पष्ट केले. UN records also changed the name of INDIA to BHARAT

जेव्हा भारत सरकार देशाचे नाव बदलण्याची औपचारिकता पूर्ण करेल, त्यानंतर ते आम्हाला कळवतील आणि आम्ही यूएन (रेकॉर्ड) मध्ये देशाचे नाव बदलू, असे संयुक्त राष्ट्र संघाच्या महासचिवांचे मुख्य प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी सांगितले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या शनिवार आणि रविवारच्या G20 शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या परदेशी नेत्यांना डिनरच्या आमंत्रणात प्रेसिडेंट ऑफ भारत लिहिले आहे. G20 शिखर परिषदेतील अध्यक्षांच्या आसनासमोर अर्थात आज पंतप्रधान मोदीं समोर देखील BHARAT असेच लिहिले आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्य सचिवांच्या प्रवक्त्यांनी केलेल्या वक्तव्याला विशेष महत्त्व आहे.

भारतात इंडिया की भारत असा नावावरून राजकीय वाद सुरू आहे. मात्र या वादावर संयुक्त राष्ट्र संघान कोणतेही भाष्य करणे योग्य नाही. कारण संयुक्त राष्ट्र संघ कोणत्याही देशाच्या अंतर्गत वादामध्ये हस्तक्षेप करत नाही, असा खुलासाही दुजारिक यांनी केला.

UN records also changed the name of INDIA to BHARAT

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात