चंद्राबाबूंना अटक केली आंध्र CID ने; लोक खापर फोडतायेत मोदींवर!!


वृत्तसंस्था

हैदराबाद : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देशम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना राज्याच्या CID ने कौशल्य विकास निगम घोटाळ्यात अटक केली. मात्र, काही लोक त्यांच्या अटकेचे खापर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका व्हिडिओवर फोडत आहेत. Andhra CID arrested Chandrababu

आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारच्या काळात 350 कोटी रुपयांचा कौशल्य विकास निगम घोटाळा झाला. त्यातले 241 कोटी रुपये शेल कंपन्यांना मध्ये वळविण्यात आले. हे ईडीच्या तपास अजून बाहेर आले. त्यानंतर आंध्र प्रदेशच्या सीआयडीने आज पहाटे 6.00 वाजता चंद्राबाबू नायडू यांना त्यांच्या निवासस्थानावर मधून अटक केली. याचे वर्णन माध्यमांनी चंद्राबाबूंना गाढ झोपेत असताना अटक केली, असे केले.

चंद्राबाबूंच्या या अटकेमुळे आंध्र प्रदेशात मोठे राजकीय वादळ उठले आहे तसेच सोशल मीडियावर ही बातमी जोरदार ट्रेंड होत आहे. पण त्यांच्या अटकेचे खापर काही लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका व्हिडिओवर फोडत आहेत. पंतप्रधान मोदी चंद्राबाबूंना खुर्ची ऑफर करून त्यांना त्यावर बसवू पाहत आहेत, पण चंद्राबाबू मात्र त्याला नकार देत आहेत, असा हा व्हिडिओ आहे आणि अनेकांनी “इथून चंद्राबाबूंच्या अटकेची खरी सुरुवात झाली”, असे लिहिले आहे.

मात्र सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी संजय कुमार यांनी चंद्राबाबूंच्या अटके संदर्भात पूर्णपणे वेगळा खुलासा केला आहे. 2014 मध्ये चंद्राबाबूंच्या सरकारच्या नेतृत्वाखाली कौशल्य विकास निगम स्थापन केली. मात्र त्यामध्ये सुमारे 350 कोटी रुपयांचा घोटाळा झाला. त्यातले 241 कोटी रुपये शेल कंपन्यांमध्ये वळविण्यात आले. काही पैसे व्यक्तिगत खात्यांमध्ये वळविण्यात आले. या घोटाळ्यासंदर्भात चंद्राबाबूंना आज सकाळी 6.00 वाजता अटक केली, असे सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी संजय कुमार यांनी स्पष्ट केले.

Andhra CID arrested Chandrababu

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात