विशेष प्रतिनिधी
पुणे : डेक्कन काॅलेजमधील निवृत्त प्राध्यापक, टिमविच्या भारतीय विद्येच्या अभ्यासक्रमांच्या दीर्घकाळच्या अध्यापक, भांडारकर संस्थेच्या आजीव सदस्य आणि कार्यकारी मंडळाच्या माजी सदस्य आणि अनेकांच्या पीएचडीच्या मार्गदर्शक डाॅ. गौरी लाड यांचे आज मुंबई येथे दुःखद निधन झाले. Dr Gauri lad passed away
त्यांचं वय ७९ वर्षे होतं. त्या अविवाहित होत्या. महाराष्ट्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी पुरुषोत्तम मंगेश लाड यांच्या त्या कन्या होत.
महाभारताचा पुरातत्त्वीय पुरावा हा डॉ. लाड यांच्या प्रबंधाचा अभ्यासाचा विषय होता. १९७८ मध्ये त्यांचा हा प्रबंध डेक्कन कॉलेज ने प्रसिद्ध केला होता. प्राचीन भारतीय साहित्य, धर्म आणि तत्वज्ञान, बौद्ध वाड्ःमय, प्राचीन भारतातील सामाजिक, आर्थिक व राजकीय संस्था अशा विविध विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. नागपूर जवळील भागीमहाडी येथील महापाषाणयुगीन संस्कृतीच्या उत्खननात त्यांचा मोठा सहभाग राहिला होता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App