सकाळी बारामतीत अजितदादांना “आपलं” म्हणणाऱ्या शरद पवारांचे दुपारी साताऱ्यात घुमजाव; कार्यकर्त्यांचे भिरभिरे!!

प्रतिनिधी

सातारा : सकाळी बारामतीत अजित पवारांना “आपलं” म्हणणारे शरद पवार दुपारी साताऱ्यात पोचल्यावर फिरले आणि अजित पवार “आपले” नाहीत असे म्हणून त्यांनी  घुमजाव केले. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मात्र भिरभिरे झाले!!Sharad pawar backtracked his earlier statement in baramati about ajit pawar in satara

उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते असल्याचे वक्तव्य शरद पवारांनी बारामतीत सकाळी केले. मात्र साताऱ्यात त्यांनी दुपारी मात्र घुमजाव केले. मी तसे बोललेलो नाही, तर सुप्रिया सुळे तशा म्हणाल्या असल्याचे शरद पवार यांनी दुपारी सांगितले. शरद पवारांच्या भूमिकेवरील संभ्रम आणखी वाढला आहे.


 


 

माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी दोन्ही वक्तव्य केली आहेत. त्यामुळे हा संभ्रम आणखी वाढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली नाही. तसेच अजित पवार हे आमचे नेते असल्याचे म्हणालो नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. पक्षातील काही लोकांनी दुसरी भूमिका घेतली, त्यांनी पक्ष सोडला तर त्याला पक्षात फूट पडली असे म्हणता येत नाही. असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. ज्याना जायचे होते, त्यांनी नवीन मार्ग स्वीकारला असेल, तर त्याला फूट पडली असे म्हणता येत नसल्याचेही ते म्हणाले.

 पवार सकाळी बोलले

सुप्रिया सुळे, अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत, त्यात काही वादच नाही. फूट पडणे याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी होते, जर पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा झाला तर, आज तशी स्थिती येथे नाही. असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. यावर राज्यभरातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. यावरुन अनेक राजकीय अर्थ काढले जात होते.

आता अजित पवारांना संधी नाही

पहाटेच्या शपथ विधी नंतर एकदा संधी दिली होती. आता त्यांनी संधी मागायची नाही तर आम्ही देखील त्यांना संधी द्यायची नाही, अशी आमची भूमिका असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. आता त्यांना संधी द्यायची नसते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवारांच्या विधानावर अजितदादांचे नो कॉमेंट्स

अजित पवार आमचेच नेते आहेत, या शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवार यांनी ‘नो कॉमेंट्स’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच, मला या विषयावर काहीच बोलायचे नाही. तुम्ही सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर विचारा ना, असे आवाहनच पत्रकारांना केले.

Sharad pawar backtracked his earlier statement in baramati about ajit pawar in satara

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात