पंढरपूर मंदिर विकास आराखडा आणि अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली राज्य शिखर समितीची बैठक

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य शिखर समितीच्या बैठकीत ७३ कोटी ८० लाख रुपयांच्या पंढरपूर मंदिर विकास आराखडा आणि ३६८ कोटी रुपयांच्या अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास आज मान्यता देण्यात आली. Approval of Pandharpur Temple Development Plan and Akkalkot Pilgrimage Development Plan

राज्यातील ज्या मंदिर, देवस्थानांमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते त्यांचे डिजिटल मॅपिंग करण्यात यावे. जेणेकरून भाविकांना अधिकाधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे शक्य होईल. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील सर्व रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी. रस्त्यावर एकही खड्डा दिसता कामा नये. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नगरविकास विभागाने तातडीने १० कोटी रुपयांचा निधी पंढरपूर नगरपरिषदेस वितरित करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत दिले. याशिवाय यात्रा अनुदान ५ कोटींवरुन १० कोटी रुपये करण्याची घोषणाही त्यांनी केली.

Approval of Pandharpur Temple Development Plan and Akkalkot Pilgrimage Development Plan

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात