प्रतिनिधी
संभाजीनगर : वाळूज औद्योगिक नगरीतील मेटलमॅन ऑटो प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट नंबर बी 12 या कंपनीत प्रोडक्शन विभागाने गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. मेटलमॅन ऑटो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत मोटर सायकलचे चेसिस, मोटर सायकलचे पार्ट असेम्ब्ली बनवण्याचे काम चालते. या कंपनीत चक्क रोबो गणरायाची आरती दररोज करतो आहे.In the sand industrial city of Sambhajinagar, a robot is doing Bappa’s Aarti!!
100 रोबो वेल्डर
या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत मोटर सायकलच्या चेसिसला वेल्डिंग मारण्याचे काम रोबोद्वारे केले जाते, 100 रोबो मोटर सायकलच्या चेसिसला वेल्डिंग करतात. काम सुलभ करण्याकरिता रोबोच्या तंत्रज्ञानाचा वापर मेटलमॅन ऑटो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने मोठ्या दिमतीने केल्याने कंपनीच्या उत्पादनाचा दर्जा आणि कामाचा वेळही सुखकर झाला आहे.
आपल्या कंपनीची गुणवत्तेची कामाची वेळ सुलभ करण्यास रोबो महत्वपूर्ण हातभार लावत असल्याने कंपनीत प्रतिष्ठापणा केलेल्या गणरायाची आरतीही चक्क रोबोद्वारे केली जात आहे. बाप्पांची आरती करणारा रोबो औद्योगिक वाळूज नगरीत कुतूहलाचा विषय ठरत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App