विशेष प्रतिनिधी
जालंधर: ‘आपले गुरु आणि संत सांगून गेले आहेत. पापाचा घडा भरला की तो फुटतोच. आज काँग्रेसचीही तशीच अवस्था झाली आहे. त्यांनी जी कर्म करून ठेवली आहेत त्याची शिक्षा आज ते भोगत आहेत. काँग्रेस पक्षाचा पुरता विस्कोट झाला आहे. पक्षातीलच लोक नेत्यांना उघडे पाडण्याचे काम करत आहेत, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.Prime Minister Narendra Modi’s allegation that the situation of Congress is the same as when the pot of sin is full
पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज जालंधर येथे पहिली प्रचारसभा झाली. या सभेत बोलताना पंतप्रधानांनी राज्यातील सत्ताधारी काँग्रेस पक्षाला लक्ष्य केले व चरणजीतसिंग चन्नी यांच्या सरकारवर गंभीर स्वरूपाचा आरोप केला.
मोदी म्हणाले, काँग्रेस पक्षाचा कंट्रोल ज्या एका घराण्याच्या हाती आहे त्यांचा पंजाबवर राग आहे. पंजाबशी जुनं वैर आहे. त्यामुळेच जोपर्यंत काँग्रेस पक्ष या घराण्याच्या कब्जात आहे तोपर्यंत हा पक्ष पंजाबचं भलं करू शकत नाही, अशी तोफ मोदींनी डागली. १९८४च्या शीख दंगलीची चौकशी करण्यासाठी आम्ही एसआयटी स्थापन केली आणि पीडितांना मदतीचा हात दिला. मात्र, काँग्रेसने दंगलीतील आरोपींना पक्षात मोठी पदे देऊन नेहमीच पीडितांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केले.
पंजाबमध्ये एनडीएचं सरकार येणार हे निश्चित असून नवा पंजाब घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे यावेळी मोदींनी सांगितले. पंजाबमध्ये विकासाचा नवा अध्याय सुरू होणार आहे. येथील प्रत्येक नागरिक आणि तरुणांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आमचे प्रयत्न कुठेही कमी पडणार नाहीत, असा विश्वासही मोदींनी यावेळी दिला.
पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्याने मोठी खळबळ उडाली होती. हुसैनीवाला येथे जात असताना निदर्शकांनी ताफा रोखल्याने पंतप्रधानांना सुरक्षेच्या कारणास्तव पुढील सर्व कार्यक्रम रद्द करून मागे फिरावे लागले होते. ५ जानेवारी रोजी फिरोजपूरमध्ये हा प्रकार घडला होता.
त्यानंतर पंजाब विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने प्रथमच पंतप्रधान येथे आले असून त्यांनी पहिला वार काँग्रेस आणि राज्य सरकारवर केला. ‘ही सभा झाल्यानंतर त्रिपुरमालिनी देवीचे दर्शन घेण्याची माझी इच्छा होती.
मात्र, येथील प्रशासन आणि पोलिसांनी हात वर केले. रस्तेमार्गे जायचे झाल्यास आम्ही त्यासाठी व्यवस्था करू शकणार नाही. तुम्ही हेलिकॉप्टरने तिथे जावे, असे मला सांगण्यात आले. ही येथल्या सरकारची आजची अवस्था आहे’, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी चन्नी सरकारवर निशाणा साधला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App