विशेष प्रतिनिधी
पणजी : गोव्यातही महाराष्ट्राप्रमाणेच महाविकास आघाडी करण्याच्या हालचाली सुरु असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमी शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण चर्चा झाली आहे. मात्र, शिवसेनेने सात ते आठ जागा मागितल्याने कॉँग्रेस काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.In Goa too, Mahavikas Aghadi, responsibility on Sanjay Raut, seven to eight seats demanded from Congress
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी गोव्यातील स्थानिक नेतृत्त्वासोबत आज महत्त्वपूर्ण चर्चा केली. गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव, गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत तसंच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या सोमवारी संध्याकाळच्या सुमारास बैठक झाली.
या बैठकीमध्ये शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येऊन निवडणूक लढवण्याच्या दृष्टीनं चर्चा झाली.शिवसेना नेते-खासदार संजय राऊत आणि काँग्रेस गोवा प्रभारी दिनेश गुंडुराव, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यात आज सायंकाळी बैठक झाली होती.या बैठकीत एकत्र येऊन निवडणूक लढवण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची चर्चा झाल्याचं सांगितलं जातंय.
शिवसेनेची गोव्यात फारशी ताकद नाही. त्यातही उत्तर गोव्यातील मोजक्याच मतदारसंघात शिवसेनेचं प्राबल्य आहे. दक्षिण गोव्यात तर गोव्याच अस्तित्व नगण्य असल्यासारखंच आहे. अशावेळी जर महाविकास आघाडीसारखा प्रयोग झाला, तर शिवसेनेच्या वाट्याला किती जागा येणार, हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App