पुण्यात येत्या आठवड्यापासून गुंठेवारी नियमितीकरण; महापालिका प्रशासनाचे महापौरांना सादरीकरण


प्रतिनिधी

पुणे : पुणे महापालिका परिक्षेत्रात पुढच्या आठवड्यापासून गुंठेवारी नियमितीकरण सुरु होत असून यासंदर्भात महापालिका प्रशासनाने पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना तसेच महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना सादरीकरण केले आहे. Gunthevari in pune to be regularize from next week

शासकीय तसेच महापालिका अंतर्गत नियमावलीनुसार पुणे महापालिका परिक्षेत्रात गुंठेवारीचे नियमितीकरण करण्यात येणार आहे. संबंधित प्रक्रियेची माहिती महापालिका प्रशासनाने महापौर आणि अन्य पदाधिकाऱ्यांना दिली. यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करून माहिती दिली आहे.

 चंद्रकांत दादा पाटील यांची ट्विट अशी :

  •  या सर्व विषयात पुणे महानगरपालिकेस मोठ्या प्रमाणावर महसूल मिळेल. त्यामुळे विकासकामांसाठी अधिक निधी उपलब्ध होऊ शकेल. तरी आता प्रशासनाने त्वरित प्रकरणे दाखल करून घेऊन छाननीअंती नियमितिकरण करून सामान्यांना दिलासा द्यावा. लालफितीत न अडकवता ठराविक मुदतीत नियमितिकरण पूर्ण करावे.
  •  पुणे मनपा प्रशासनाने आज महापौर मुरलीधरआण्णा मोहोळ आणि अन्य पदाधिकाऱ्यांपुढे गुंठेवारीबाबत सादरीकरण करून येत्या आठवड्यात गुंठेवारी अंतर्गत नियमितिकरणास सुरुवात होत असल्याचे नमूद केले. याचे स्वागत करून सकारात्मक भूमिका घेणाऱ्या प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो.
  •  १८ ऑक्टोबर २०२१ला नगरविकास खात्याने सुधारित अधिनियम लागू केले. त्या आदेशानुसार गुंठेवारी पद्धतीने झालेला विकास नियमित करण्यासाठी सुधारित प्रशमन आणि विकास शुल्क निश्चित झालंय. त्यामुळे गुंठेवारी प्रकरणे दाखल करून त्रस्त नागरिकांना दिलासा द्यावा, अशी माझी भूमिका आहे.

Gunthevari in pune to be regularize from next week

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात