विशेष प्रतिनिधी
मुंबई : अर्जुन रेड्डी फेम अॅक्टर विजय देवरकोंडा याचा नवीन चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘लायगर’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचा टीझर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये विजयला एक चायवाला आणि स्लमडॉग असे म्हणून संबोधण्यात आले आहे. जो पुढे जाऊन लॉस वेगसमधील MMA चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होतो.
Vijay Devarakonda Rocks! Liger movie teaser is out
त्याचा हा प्रवास, त्याची ही जर्नी या चित्रपटामध्ये दाखवली जाणार आहे. चित्रपटाचा टीझर अतिशय अपेक्षा वाढवणारा आहे. विजय देवरकोंडाने घेतलेली मेहनत या चित्रपटाच्या टिझरमध्ये साफ झळकू येते.
जगप्रसिद्ध बॉक्सिंग चॅम्पियन ‘माईक टायसन’ झळकणार विजय देवरकोंडाच्या लायगर सिनेमात?
या चित्रपटामध्ये रोनित रॉय, अनन्या पांडे आणि माईक टायसन देखील झळकणार आहेत. 25 ऑगस्ट 2022 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल. पुरी जगन्नाथ यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे.
अर्जुन रेड्डी, गीता गोविंदम, डियर कॉम्रेड, वल्ड फेमस लव्हर, महानटी ह्या यशस्वी चित्रपटाचा नायक विजय होता. लायगर ह्या सिनेमातून तो हिंदी चित्रपटात पदर्पण करत आहे. ह्या चित्रपटाचा निर्माता करण जोहर आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App