विशेष प्रतिनिधी
मुंबई : देसी गर्ल प्रियांका चोप्रा बॉलीवूडचे आणि भारताचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे करते आहे. तिचे क्वांटिको, बेवॉच, इजंट इट रोमँटिक हे आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि सिरीज प्रदर्शित झाले होते. नुकताच तिने मॅट्रिक्स या सिनेमामध्ये सती हा रोल प्ले केला होता. या सिनेमामध्ये सती ही एक एक्झाइल्ड प्रोग्राम असते. तिच्या स्क्रीन टाईम भरून बरेच लोक तिला ट्रोल करत आहेत.
My role in Matrix Cinema is small though very important; Desi Girl Priyanka Chopra
एशियन संडे टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत तिने याबाबत आपले मत व्यक्त करताना म्हटले आहे की, जेव्हा मी बॉलीवूडमध्ये रोल निवडायचे, तेव्हादेखील मी रोल किती छोटा आहे, मोठा आहे याचा विचार करत नव्हते. आणि असा विचार करणे हे अतिशय कमीपणाचे लक्षण आहे.
‘निक जोनासची पत्नी’ असे संबोधलेल्या एका वृत्तपत्राला प्रियांका चोप्राने चांगलेच खडसावले
पुढे ती म्हणते की, मॅट्रिक्स सिनेमामध्ये आधीपासून हे तिघे लीडिंग रोलमध्ये आहेत. तेव्हा मी त्यांच्यासोबत स्पर्धा करणे हे देखील चुकीचे आहे. माझा रोल जरी छोटा असला तरी तो अतिशय महत्त्वाचा रोल आहे, असे तिने सांगितले आहे.
प्रियांका आगामी अमॅझॉन सीरिजच्या ‘सिटाडेल’ या थ्रिलर सीरिजमध्ये झळकणार आहे. त्याचप्रमाणे ‘टेक्स्ट फॉर यू’ हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे.
त्याचप्रमाणे जगप्रसिध्द ओशो यांची सेक्रेटरी मा आनंद शीला यांच्या आयुष्यावर देखील चित्रपट लवकरच येणार आहे. आणि हा चित्रपट प्रियांका स्वतः प्रोड्यूस करणार आहे. अमॅझॉन स्टुडिओज मार्फत बनवल्या जाणाऱ्या ह्या चित्रपटामध्ये प्रियांका मा आनंद शीला यांचे कॅरेक्टर प्ले करताना दिसणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App