प्रतिनिधी
पुणे : उद्धवजी, दोन पिढ्या ज्यांच्याशी संघर्ष केला त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसलात. पण आमच्याबरोबर प्रचार करताना तुमच्या पाठीमागचे बॅनर तरी पाहीचेत. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोचा साईज आणि तुमच्या फोटोचा साईज मधला फरक पहा. मोदींचा फोटो तुमच्या चौपट आकाराचा होता. महायुती निवडणूक जिंकली, तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनतील हे स्वतः मोदी आणि मी तुमच्यासमोर जाहीर व्यासपीठावर सांगितले होते. पण तुम्ही हिंदुत्वाशी गद्दारी केलीत आणि सत्तेवर बसलात, असे एकाचढ एक भीम टोले केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज लगावले. a three wheeled autorickshaw that failed, targets Amit Shah
राज्यातील आघाडी सरकार म्हणजे तीन चाकांचे ऑटो रिक्षावाले सरकार आहे. या सरकारचे तिन्ही चाके पंक्चर असून हे सरकार हलतही नाही आणि चालतही नाही, अशा शब्दांत अमित शहा यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारची खिल्ली उडवली.
अमित शहांनी पुण्यात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. राज्यातील तीन चाकांचे ऑटोरिक्षावाले सरकारची तिन्ही चाके पंक्चर आहेत. ते चालत नाही. फक्त धूर सोडते आणि प्रदूषण करते, अशी अमित शहा यांनी केली.
मुख्यमंत्र्यांची तब्येत ठीक नाही. त्यांचे आरोग्य उत्तम राहावे. पण जेव्हा त्यांची तब्येत चांगली होती तेव्हाही कुठे ते बाहेर फिरत होते. तेव्हाही सरकार कुठे आहे याचा जनता शोध घेत होती. कोरोना काळात मोदींनी 20 वेळा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. तीन वेळा राज्यपालांशी संवाद साधला. अनेक रुग्णालयांशी संवाद साधला, असेुही त्यांनी सांगितले.
2019मध्ये महाराष्ट्रात निवडणुका होत्या. त्यावेळी मी स्वत: इथे आलो होतो. मी स्वत: शिवसेनेशी संवाद साधला. तेव्हा फडणवीसांच्या नेतृत्वातच निवडणुका लढायचे ठरले होते. मुख्यमंत्रीही भाजपचाच होणार हे सुद्धा ठरले होते. पण शिवसेना फिरली. त्यांनी हिंदुत्वाशीही तडजोड केली. दोन पिढ्यांपासून ज्यांच्याविरोधात लढले त्यांच्याच मांडीवर जाऊन बसेल आणि म्हणतात आम्ही असे म्हणालोच नाही, असा हल्लाही त्यांनी चढवला.
स्वत: ठरलेल्या गोष्टींवर घुमजाव केले आणि म्हणतात मी खोटे बोलत आहे. मी खोटे बोलतोय असे थोडावेळ मानूही. पण तुमच्या सभेच्या पाठीमागे जे बॅनर लागत होते त्यावर तुमच्या फोटोची आणि मोदींच्या फोटोची साईज पाहा. तुमच्या फोटोची एक चतुर्थांश साईज होती. प्रत्येक भाषणात तुम्हाला मोदींचे नाव घ्यावे लागत होते. तुमच्या उपस्थित मी आणि मोदींनी सांगितले होते, की, फडणवीसांच्या नेतृत्वातच निवडणुका लढवल्या जातील आणि एनडीए निवडणूक जिंकल्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री होतील. पण तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे होते म्हणून तुम्ही आमच्यासोबत विश्वासघात केला सत्तेत बसले, असा हल्लाही त्यांनी चढवला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App