विरोधी ऐक्यातून पवार – राऊतांचा ममतांनाच कात्रजचा घाट?; सोनियांच्या घरच्या बैठकीत डावे सीताराम येचुरीही सामील!!

गेल्या सहा महिन्यांपासून गाजत असलेल्या सर्व विरोधी पक्षांच्या ऐक्याचे 360 अंशांमधले वेगळेच वळण आज आले आहे काय? काल-परवापर्यंत काँग्रेसला वगळून सर्व विरोधी पक्षांचे ऐक्य साधण्याची भाषा करणारे नेते आज एकदम “यु टर्न” घेऊन जेव्हा 10 जनपथ मध्ये पोहोचले, तेव्हा विरोधी ऐक्याने देखील हा “यू-टर्न” घेतल्याचे स्पष्ट झाले…!!Leftist Sitaram Yechury also joins Sonia’s house meeting !!

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जशा राज्यातल्या विधानसभा निवडणुका जिंकल्या तशी त्यांची महत्त्वाकांक्षा “खूपच” फुलली आहे. त्यांनी काँग्रेसला वगळून सर्व प्रादेशिक पक्षांचे ऐक्य साधण्याचा घाट घातला. त्याला सुरुवातीला शरद पवार आणि शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतिसाद दिला. जणू काही आता ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला वगळून सर्व विरोधकांचे ऐक्य उभे राहणार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देणार, असे राजकीय चित्र उभे राहिले. ममता बॅनर्जी यांनी तर मुंबईत शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओकच्या पोर्चमध्ये त्यांच्या शेजारी उभे राहून संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीएचे राजकीय अस्तित्वच पुसून टाकले.



आज तेच शरद पवार हे सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी संजय राऊत यांच्यासह पोहोचले. त्यांनी तिथे राजकीय खलबते केली. सगळ्याच राजकीय चर्चा बाहेर सांगता येत नाहीत, अशी प्रतिक्रियाही व्यक्त केली. सोनियांच्या घरच्या याच बैठकीला गेल्या कित्येक दिवसांपासून राजकीयदृष्ट्या अडगळीत पडलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी हे देखील पोहोचले. त्यांच्या उपस्थितीमुळेच हा राजकीय प्रश्न तयार झाला आहे, की ज्या ममता बॅनर्जी या काँग्रेसला वगळून विरोधकांचे ऐक्य साधू इच्छित होत्या त्या ममता बॅनर्जी यांनाच वगळून सोनिया गांधी पुन्हा एकदा संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएची मोट बांधत आहेत का…?? सोनिया गांधींच्या या प्रयत्नांना शरद पवार आणि संजय राऊत हे साथ देत आहेत का…?? कारण आज तर बैठक संपन्न झाली. पण उद्या देखील बैठक होणार आहे आणि त्या बैठकीलाही शरद पवार आणि संजय राऊत हे उपस्थित राहणार आहेत…!!

याचा अर्थ शरद पवार आणि संजय राऊत या दोन्ही नेत्यांनी ममता बॅनर्जी यांना कात्रजचा घाट दाखवून विरोधी ऐक्यापासून वेगळे काढून टाकले आहे का?? कारण या सोनियांच्‍या घरी 10 जनपथ वर झालेल्या बैठकीत तृणमूल काँग्रेसचे नेते, आंध्रातल्या वायएसआर काँग्रेसचे नेते उपस्थित नव्हते.

त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या पुढे आता खऱ्या अर्थाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस वगळून इतर प्रादेशिक पक्षांचे ऐक्य घडविण्याचा पर्याय उरला आहे का? हा राजकीय प्रश्न देखील आता उपस्थित होत आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये शरद पवार यांनी एकदा ममता बॅनर्जी यांची बाजू घेतली आहे आणि आता ते सोनिया गांधींच्या बाजूने गेले आहेत.

शरद पवार यांची ही नेहमीची राजकीय खेळी आहे का?? एकाच वेळी ते दोन डगरींवर हात ठेवत आहेत का?? पवार नेमके कोणाला कात्रजचा घाट दाखवत आहेत?? ममतांना की सोनियांना?? की या घाटात नंतर ते स्वत:च अडकणार आहेत?? शरद पवार यांची विरोधी ऐक्याबाबत नेमकी भूमिका काय??, यावर सोनियांच्या घरच्या बैठकीनंतर ठळक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Leftist Sitaram Yechury also joins Sonia’s house meeting !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात