प्रा. सतीश उपळावीकर यांनी कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम पहात असतानाच केवळ सव्वा तासात अभिनेते महानायक अमिताभ बच्चन यांचं १०० स्क्वेअर फूट पोर्ट्रेट बनवलं.KBC: Pvt. Upalavikar made a portrait of Amitabh Bachchan; Even Amitabh Bachchan was overwhelmed
विशेष प्रतिनिधी
मुंबई : विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूरच्या ग्राफिक डिझाईन विभागाचे प्रमुख कऱ्हाडमधील प्रा. सतीश उपळावीकर यांनी कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम पहात असतानाच केवळ सव्वा तासात अभिनेते महानायक अमिताभ बच्चन यांचं १०० स्क्वेअर फूट पोर्ट्रेट बनवलं.
या कामात प्रा. उपळावीकर यांचे चिरंजीव ऋषिकेश यांनीही त्यांना मोलाचं सहकार्य केलं.यावेळी अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपचे प्रमुख सतीश मोरे,सलीम मुजावर, गजेंद्र सुर्वे , सतीश भोंगाळे, डॉ. चिन्मय एरम, यासह बच्चन प्रेमी उपस्थित होते.
तसेच प्रा. उपळावीकर यांचे चिरंजीव ऋषिकेश यांनी बनवलेलं अर्कचित्र महानायक अमिताभ बच्चन यांना प्रेझेंट देण्यात आलं. या दोन्ही चित्रांच्या प्रतिकृतीवर अमिताभ बच्चन यांनी स्वाक्षरी केलीय.केबीसीच्या सेटवर हे पोर्ट्रेट पाहिल्यानंतर स्वतः अमिताभ बच्चनही भारावून गेले.यावेळी अमिताभ बच्चन म्हणाले की , ‘अरे अपने कैसे बनाए ए सब, बहूत खुब, मैं इसे जलसा पर लेकर जाऊंगा’ अशा शब्दांत बच्चन यांनी प्रा. उपळावीकर यांचं कौतुक केलंय.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App