विशेष प्रतिनिधी
हॉलीवूड : हॅरी पॉटरच्या चाहत्यांसाठी एक खुश खबर आहे. वन लास्ट टाईम ट्रीट म्हणून ‘हॅरी पॉटर – रिटर्न टू हॉगवॉर्ट्स’ चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हॅरी पॉटरची पहिली मूव्ही हॅरी पॉटर प्रदर्शित होऊन 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. ही 20 वर्ष साजरी करण्यासाठी म्हणूनच एचबीओ मॅक्स आणि वॉर्नर ब्रदर्सनी एकत्र येऊन हे रियुनियन करण्याचे ठरवले आहे.
Harry Potter – Return to Hogwarts Trailer has been released
या ट्रेलरमध्ये सर्वांना हॉगवार्ट्समध्ये परत येण्याचे इन्व्हिटेशन मिळाले आहे, असे दाखवण्यात आले आहे. हरमायनी, हॅरी आणि रॉन या तिघांचे चाहते अख्ख्या जगभर पसरले आहेत आणि या तिघांना पुन्हा एकत्र बघण्यासाठी त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आणि हा वेट आता फायनली संपणार आहे. 1 जानेवारी 2022 रोजी हॅरी पॉटर रिटर्न टू हॉगवॉर्ट्स प्रदर्शन रिलीज होणार आहे.
‘हॅरी पॉटर : रिटर्न टू हॉगवॉर्ट्स’ च्या निमित्ताने हॅरी, रॉन, हरमायनी पुन्हा एकत्र झळकणार, 1जानेवारी 2022 रोजी होणार प्रदर्शित
दोन दशकांपासून सुरु असलेला थरार आणि फ्रेशनेस पुन्हा एकदा त्यांच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. हरमायनी, हॅरी आणि रॉन या तिघांनी मिळून केलेल्या साहसी कामांना पुन्हा एकदा उजाळा मिळणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App