विशेष प्रतिनिधी
मुबंई : इंटरनेटवर सध्या कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाच्या चर्चानी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दोघे राजस्थानमध्ये 7 डिसेंबर ते 9 डिसेंबरपर्यंत तीन दिवसांचे जंगी पार्टी देऊन लग्न करणार आहेत, असे देखील बोलले जात आहे. त्यांच्या लग्नामध्ये कोण कोण येणार, काय जेवणाचे मेनू असणार, मेहंदी किती रुपयांची लागणार, सब्यासाचीचा लेहंगा असणार का, अशा चर्चांना अक्षरशः इंटरनेटवर उधाण आले आहे.
The wedding of Katrina Kaif and Vicky Kaushal?
अभिनेत्री हेमा मालिनी ह्या वृद्ध झालेल्या आहेत, कॅटरिना कैफच्या गालांसारखे रस्ते बनवा ; नवनिर्वाचित राजस्थानचे ग्रामीण विकास मंत्री राजेंद्र गूढा
याच गर्दीमध्ये या दोघांचा आणखी एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. 2019 मधील अवॉर्ड शोचा हा व्हिडीओ आहे. कॅटरिना जेव्हा अवॉर्ड घेण्यासाठी स्टेजवर आली होती. तेव्हा होस्ट विकी कौशलने कँटिनला विचारले होते की, ‘तुम किसी अच्छे से विकी कौशल को देख के शादी क्यूं नही करती? आणि अशा प्रकारे विकी कौशलने तिला प्रपोज केले होते.
ह्या प्रपोजलनंतर सलमान खानने चक्कर येऊन पडण्याची अॅक्टिंग देखील केली होती. काही वर्षांपूर्वी सलमान खान आणि कॅटरिना कैफ एकमेकांना डेट करत होते. अशाप्रकारे विकिने तिला प्रपोज केले होते, हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App