विशेष प्रतिनिधी
मुंबई: हेमंत ढोमे यांचा झिम्मा हा कोरोनामुळे प्रदर्शित होऊ न शकलेला चित्रपट उद्या १९ नोव्हेंबर ला प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट वेगळ्या विषयावर असल़ेंने चर्चेत होता. काही स्त्रिया आपल्या जबाबदाऱ्या बाजूला ठेवून इंग्लडला जातात व आपल्या मर्जीप्रमाणे जगतात व काय धमाल करतात असा वेगळा विषय मांडला आहे. या स्रिया वय, व कौटुंबिक पार्श्वभूमीपण वेगवेगळी असलेल्या आहेत. त्या एकूण सात जणी आहेत.
Hemant Dhome’s new film Jhimma will be released on November 19
या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव, सुचित्रा बांदेकर आणि सुहास जोशी यांच्या भूमिका आहेत. तसेच इरावती कर्णिक यांनी लिहिलेला व हेमंत ढोमे यांच्या चलचित्र कंपनीने हा चित्रपट निर्मित केला आहे.
Annaatthe Movie Box Office:माईंड इट ! रजनीकांतच्या ‘अन्नात्थे’ चा विक्रम, अवघ्या दोन दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार
अमितराज यांचे संगीत असून माझे गाव हे अपेक्षा दांडेकर हिने गायलेले यातील गाणे सोशल मिडियावर चर्चेत आहे. यातील कलाकार सिद्धार्थ चांदेकर हा याआधी सिटी ऑफ ड्रीम्स या सुप्रसिद्ध वेब सिरीजमधून झळकला होता. सोनाली कुलकर्णी हीचा छत्रपती ताराराणी हा ऐतिहासिक सिनेमापण आता रिलीज होत आहे. बुक माय शो या वेबसाइटवर आपण झिम्मा या चित्रपटासाठी ॲडव्हान्स बुकिंग करू शकता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App