Annaatthe Movie Box Office:माईंड इट ! रजनीकांतच्या ‘अन्नात्थे’ चा विक्रम, अवघ्या दोन दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार


चित्रपट आणि व्यापार विश्लेषक मनोबाला विजयबालन यांनी ‘अन्नात्थे’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती शेअर केली आहे. Annaatthe Movie Box Office: Mind It! Rajinikanth’s ‘Annathe’ record crosses Rs 100 crore mark in just two days


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सुपरस्टार रजनीकांत यांचा ”अन्नात्थे ” हा चित्रपट दिवाळीच्या दिवशी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. मेगास्टारचे चाहते ‘अन्नात्थे’च्या रिलीजची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. त्यामुळेच या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. रजनीकांतचा ‘अन्नात्थे’ चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.

चित्रपट आणि व्यापार विश्लेषक मनोबाला विजयबालन यांनी ‘अन्नात्थे’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती शेअर केली आहे. ‘अन्नात्थे’च्या पहिल्या कलेक्शनचे वर्णन करताना त्यांनी लिहिले आहे की, या चित्रपटाने पहिल्या दिवशी 70.19 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आणि बॉक्स ऑफिसवर उत्तम कलेक्शन केले.तर दुसऱ्या दिवशी ‘अन्नात्थे’चे कलेक्शन रु. ४२.६३ कोटी आहे. अशाप्रकारे चित्रपटाने 112.82 कोटी रुपयांचा गल्ला जमवत अवघ्या दोन दिवसांत 100 कोटींचा जादुई आकडा पार करत थलैवासाठी तो काहीही करू शकतो हे सिद्ध केले आहे. ‘अन्नात्थे’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर अशीच धूम सुरू राहिली तर रजनीकांतचा चित्रपट २०० कोटींचा टप्पा ओलांडेल तो दिवस दूर नाही.

‘अन्नात्थे’ या चित्रपटात सुपरस्टार रजनीकांतसोबत दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री कीर्ती सुरेश मुख्य भूमिकेत दिसणार आहे.अन्नात्थे चित्रपटाचे संगीत डी इमान यांनी दिले आहे, तर चित्रपटाचे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन सिरूथाई सिवा यांनी केले आहे. रजनीकांत यांचा ‘अन्नात्थे’ हा एक कौटुंबिक नाटक चित्रपट आहे.ज्यामध्ये भाऊ-बहिणीच्या नात्याची कथा सुंदरपणे दाखवण्यात आली आहे.

Annaatthe Movie Box Office: Mind It! Rajinikanth’s ‘Annathe’ record crosses Rs 100 crore mark in just two days

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण