विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : १० महिन्यात दुसऱ्या वेळी या आमदाराविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. राजस्थानमधील आमदार प्रताप भील यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजस्थानच्या गोगुंडा मतदार संघातील भील भाजपाचे आमदार आहेत. नोकरीचे आश्वासन व लग्नाचे आमिष दाखवून महिलांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप दोन्ही प्रकरणांत आहे.
BJP Mla Pratap Bhil filed under allegation of rape charges second time
यातील दुसऱ्या घटनेत अंबामाता पोलिस स्टेशनमध्ये एका महिलेने प्रताप भीलने नोकरीचे आश्वासन दिले व बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. तसेच तिच्यावर लग्नाचे आश्वासन देऊन अनेकदा बलात्कार केल्याची तक्रार तिने दाखल केली आहे. दहा महिन्यांपूर्वी या आमदारावर सुखेर येथे बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. सीआयडी या प्रकरणाचा तपास करत आहे.
Dombivli Gang Rape : आणखी दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात, सामूहिक बलात्कारप्रकरणी आतापर्यंत 28 नराधमांना अटक
ही महिला नोकरीसाठी आमदाराला भेटली. तेव्हा त्यानी तिला नोकरीचे आश्वासन दिले. तसेच त्यांनतर तो तिला वारंवार फोन करत असे. त्यांनी मला लग्न करण्याचे वचन दिले होते, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. या आमदाराने तिच्या घरी जाऊन गेल्या वर्षी मार्चमध्ये बलात्कार केल्याची तक्रार या महिलेने केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App