विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ऑनलाईन शिक्षणात गंभीर त्रुटी आहे. केवळ ३० टक्के मुलांकडे स्मार्ट फोन, इंटरनेटची सुविधा आहे. त्यामुळे ७० टक्के मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत, असा आक्षेप शिक्षण विभागाच्या संसदीय समितीने नोंदविला आहे. त्यामुळे शिक्षणासाठी सॅटेलाईट टीव्हीचा वापर करावा, अशी शिफारस केली आहे.Serious errors in online education, only 30 per cent children have smart phones, internet facilities, objection of Parliamentary Committee on Education
कोरोनाच्या साथीमुळे देशात सर्वत्र शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर ऑनलाईन शिक्षणाचाच एकमात्र पर्याय आहे. बहुतांश राज्यांत याच पध्दतीने शिक्षण दिले जात आहे. मात्र, केवळ ३० टक्के मुलांकडेच स्मार्टफोन आणि इंटरनेट आहे. त्यामुळे ७० टक्के मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत, असे संसदीय स्थायी समितीने म्हटले आहे.
राज्यांनी याची जबाबदारी स्वीकारायला हवी असेही समितीने म्हटले आहे. समितीने उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र , आंध्र प्रदेश यासह सहा राज्यांतील शिक्षण सचिवांना याबाबत नोटीस पाठविली आहे. याबाबत संसदीय समितीची शुक्रवारी बैठक होणार आहे.
यामध्ये प्रसार भारतीच्या अधिकाऱ्यांनाही बोलावण्यात आले आहे. समितीने म्हटले आहे की, कोरोना काळात मुलांच्या शिक्षणासाठी आणखी चांगल्या पर्यायांचा शोध घ्यायला हवा. यासाठी सॅटेलाईट चॅनलचा पर्याय वापरायला हवा. राज्यांनी यादृष्टीने प्रयत्न करायला हवेत.समितीने यापूर्वीही राज्यांना हा पर्याय वापरण्याच्या सूचना केल्या होत्या.
मात्र, राज्यांनी त्याकडे फार लक्ष दिले नव्हते. समितीच्या म्हणण्यानुसार वर्षाला दोन ते अडीच कोटी रुपयांच्या खर्चात सॅटेलाईट चॅनल सुरू केले जाऊ शकते. सॅटेलाईट एज्युकेशन चॅनलचे वरिष्ठ अधिकारी यावेळी प्रेझेंटेशन देणार आहेत. त्याचबरोबर बैठकीत समिती ऑनलाईन शिक्षणाबाबत राज्यांनी उचललेल्या पावलांची माहितीही घेणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App