मुकेश अंबानींनी टाकले जॅक मा यांना मागे, अशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती


चीनच्या अलीबाबा कंपनीचे प्रमुख जॅक मा यांना मागे टाकून रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी अशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीत सीरम इन्स्टिट्यूटचे सायरस पूनावाला आठव्या क्रमांकावर आले आहे.Mukesh Ambani overtakes Jack Ma, Asia’s richest businessman


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : चीनच्या अलीबाबा कंपनीचे प्रमुख जॅक मा यांना मागे टाकून रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी अशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीत सीरम इन्स्टिट्यूटचे सायरस पूनावाला आठव्या क्रमांकावर आले आहे.

फोर्ब्सच्या यादीनुसार मुकेश अंबानी यांच्या ८४.५ अब्ज डॉलर्स संपत्ती आहे. भारतातीलच नव्हे तर अशियातील सर्वात श्रीमंत असले तरी जागतिक पातळीवर मुकेश अंबानी दहाव्या क्रमांकाचे श्रीमंत आहे.

अदानी उद्योगसमुहाचे गौतम अदानी यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती ५०.५ अब्ज डॉलर आहे. जागतिक श्रीमंतांच्या यादीत ते २४ व्या क्रमांकावर आहे.

भारतातील तिसऱ्या क्रमाकंचे श्रीमंत उद्योगपती एचसीएल टेक्नॉलॉजीचे शिव नाडर आहेत. त्यांची एकूण संपत्ती २३.५ अब्ज डॉलर एवढी आहे. मुंबईतील मलबार हिल परिसरात एक हजार कोटी रुपयांचे घर विकत घेतल्याने

नुकतेच प्रसिध्दीस आलेले डी-मार्ट या रिटेल स्पेस कंपनीचे प्रमुख राझाकिशन दमानी चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत असून त्यांची एकूण संपत्ती १६.५ अब्ज डॉलर उदय कोटक १५.९ अब्ज डॉलर संपत्तीसह पाचव्या क्रमांकाचे धनिक आहे.



जगातील सर्वात मोठी स्टिल कंपनी असलेल्या आर्सेलर-मित्तलचे प्रमुख लक्ष्मीनिवास मित्तल हे भारतातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती १४.९ अब्ज डॉलर एवढी आहे.

आदित्य बिर्ला समुहाचे प्रमुख कुमार मंगलम बिर्ला या यादीत सातव्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती १२.८ अब्ज डॉलर आहे.कोरोनावर लस बनविणाºया सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे प्रमुख सायरस पूनावाला यांचे नाव यादीत आठव्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण संपत्ती ही १२.७ अब्ज डॉलर आहे.

औषध क्षेत्रातीलच एक दिग्गज कंपनी असलेल्या सन फामार्चे प्रमुख दिलीप संघवी हे भारतातील श्रीमंतांच्या यादीत नवव्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती १०.९ अब्ज डॉलर एवढी आहे

देशातील अव्वल दहा उद्योगपतींच्या यादीत भारती एअरटेलचे प्रमुख सुनील भारती मित्तल आणि त्यांचे कुटुंबीय दहाव्या क्रमांकावर आहे. त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती ही १०.५ अब्ज डॉलर (७७९.५४ कोटी रुपये) एवढी आहे.

Mukesh Ambani overtakes Jack Ma, Asia’s richest businessman

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात