उदयनराजे म्हणतात, राज्याचे राजकारण कुठं चाललंय हे मलाच कळायचं बंद झालंय


राज्याच राजकारण कुठं चाललंय हे पाहून मलाच आता कळायचं बंद झालंय. राज्यात सुरू असलेलं राजकारण हा करमणुकीचा भाग आहे, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडीचा समाचार घेतला आहे.Udayan Raje says I don’t know where the politics of the state is going


विशेष प्रतिनिधी

सातारा : राज्याच राजकारण कुठं चाललंय हे पाहून मलाच आता कळायचं बंद झालंय. राज्यात सुरू असलेलं राजकारण हा करमणुकीचा भाग आहे, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडीचा समाचार घेतला आहे.

उदयनराजे म्हणाले, गो करोना गो करोना असे म्हणून करोना जाणार नाही. त्यामुळे शासनाने लावलेल्या निबंर्धांबाबत योग्य तो पुनर्विचार करावा आणि सर्वसामान्य माणसाला जगणे कठीण होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी.

 


 


राज्य सरकारमध्ये बसलेले मुख्यमंत्री आणि मंत्री यांनासुद्धा जनतेची काळजी आहे. त्यांनाही कुटुंब, कार्यकर्ते, मतदार यांची काळजी आहे. त्यामुळे ते कोणताही निर्णय बेजबाबदारपणे चुकीचा घेणार नाहीत.

मात्र, आरोग्य महत्वाचे आहेच पण खाण्याचे काय? याचाही विचार सरकारने करावा. त्यामुळे सरकारने लोकहिताचे निर्णय घ्यावेत. जगाच्या पोटात या संसर्गाने भीतीचा गोळा निर्माण केला. या आजाराच्या नुसत्या भीतीने लाखो लोक हृदयविकाराने गेले. त्यामुळे लोकांनी न भिता संसर्गाचा सामना करावा.

शरद पवार यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी मी भेटलो. या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही, असे सांगून उदयनराजे म्हणाले, सध्या राज्याचं राजकारण कुठं चाललंय हे पाहून मलाच आता कळायचं बंद झालंय.

राज्यात सुरू असलेलं राजकारण हा करमणुकीचा भाग आहे. ही तर सुरुवात आहे. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत. तेव्हा कळेल राजकारण कुठं चाललंय.

Udayan Raje says I don’t know where the politics of the state is going

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात