विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोना लसींच्या पुरवठ्याबाबत महाविकास आघाडी सरकारकडून कांगावा केला जात आहे. कोरोना प्रतिबंधक लसींचा सर्वाधिक पुरवठा हा केंद्र सरकारकडून महाराष्ट्रालाच केला जात आहे,Devendra Fadnavis claims that the largest supply of vaccine from the Center is to Maharashtra
असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केला. माध्यमांशी बोलण्याऐवजी केंद्र सरकारशी चर्चा करावी असा सल्लाही त्यांनी दिला आहे.राज्यात कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा कमी आहे.
अनेक शहरांत दोन-तीन दिवस पुरेल इतक्याच लसी असल्याचा दावा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. केंद्राकडून महाराष्टÑासाठी जादा लसी मिळाव्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे.
यावर फडणवीस म्हणाले की, लसींच्या पुरवठ्याबाबत माध्यमांशी बोलण्यापेक्षा मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांनी केंद्र सरकारशी चर्चा करावी. राज्य सरकारमधील मंत्री आणि नेते कोरोना लसीकरणासंदर्भात करीत असलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत.
महाराष्ट्राला सुमारे एक कोटी सहा लाख डोसेसे प्राप्त. राज्यात दररोज ४ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण. ८२ लाख नागरिकांना लसीकरण करुन महाराष्ट्र देशात अग्रेसर. ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाची महाराष्ट्राची राज्य सरासरी १२.३ टक्के- मुख्य सचिव @sjkunte यांची माहती pic.twitter.com/a6IuFYD05U — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 6, 2021
महाराष्ट्राला सुमारे एक कोटी सहा लाख डोसेसे प्राप्त. राज्यात दररोज ४ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण. ८२ लाख नागरिकांना लसीकरण करुन महाराष्ट्र देशात अग्रेसर. ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाची महाराष्ट्राची राज्य सरासरी १२.३ टक्के- मुख्य सचिव @sjkunte यांची माहती pic.twitter.com/a6IuFYD05U
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 6, 2021
राज्याच्या लसीकरण क्षमतेनुसारच टार्गेट ग्रुपला आवश्यक इतक्या लसींचा पुरवठा केंद्राकडून केला जात आहे. केंद्र सरकारकडून सर्वाधिक लसी महाराष्ट्रालाच दिल्या जात आहेत. भारत सरकार काही वेगळे आहे का?
त्यामुळे राज्य सरकारमधील मंत्र्यांनी या गोष्टी माध्यमांशी बोलण्यापेक्षा केंद्राशी चर्चा करावी. माध्यमांमध्ये बोलायचे आणि हात झटकायचे हे आधी बंद झाले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.
राज्यात सातही दिवस १०० टक्के लॉकडाऊन असल्याचं चित्र आहे. विकएंडला दोन दिवस लॉकडाऊन आणि पाच दिवस कडक निर्बंध, असे सरकारकडून सांगण्यात आले होते; पण प्रत्यक्षात सर्वच बंद करून ठेवले आहे.
यामुळे राज्यातील लहान उद्योजक, छोटे व्यापारी आणि नागरिकांचा उद्रेक होईल, याची काळजी सरकारने घ्यावी, असा इशारा त्यांनी दिला. फडणवीस म्हणाले, अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याच्या मुद्द्यावरही फडणवीस यांनी सरकारवर टीका केली.
रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. त्यामुळेच तुटवडा निर्माण झाला आहे. रेमडेसिवीर हे कोरोना काळातील अत्यंत महत्त्वाचे औषध असताना, राज्य सरकारने याबाबत तत्काळ कारवाई करायला हवी. काळाबाजार रोखला गेला पाहिजे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App