पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तेवर येण्याची स्वप्ने पाहणाऱ्या ममता बॅनर्जी यांना जमीनीवरील परिस्थिती आहे याचे दर्शन आरमबाग येथील गावकऱ्यांनी घडविले. तृणमूल कॉँग्रेसच्या उमेदवार सुजाता मंडल यांना येथील गावकऱ्यांनी अक्षरश: पळवून लावले.Trinamool Congress candidate abducted by villagers sujata mandal
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तेवर येण्याची स्वप्ने पाहणाऱ्या ममता बॅनर्जी यांना जमीनीवरील परिस्थिती आहे याचे दर्शन आरमबाग येथील गावकऱ्यांनी घडविले. तृणमूल कॉँग्रेसच्या उमेदवार सुजाता मंडल यांना येथील गावकऱ्यांनी अक्षरश: पळवून लावले.
१० एप्रिल रोजी पश्चिम बंगाल निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार होणार आहे. या पार्श्वभूमीवर तृणमूल कॉँग्रेसच्या उमेदवार सुजाता मंडल एका गावात प्रचार करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी गावकऱ्यांनी त्यांना पळवून लावले.
आरमबाग येथून सुजाता मंडल तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. या घटनेला भारतीय जनता पक्ष जबाबदार असल्याची टीका करत टीएमसी नेते डेरेक ओ ब्रायन यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये सुजाता मंडल एका शेतातून गावात प्रवेश करताना दिसत आहेत. मात्र, त्या गावात येत आहे, हे पाहताच काही गावकरी काठ्या घेऊन त्यांच्या अंगावर धावून गेले.
गावकरी काठ्या घेऊन येत असल्याचे पाहता क्षणी सुजाता मंडल आणि त्यांच्यासोबत आलेल्या सहकाऱ्यांनी तेथून पळ काढला. मात्र,सुजाता मंडल यांनी यासाठी भाजपला जबाबदार धरले असून,
माज्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. दगड आणि विटा घेऊन मास्क लावलेले काही जण त्यांच्यावर धावून गेल. या हल्ल्यात सुजाता मंडल जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App